Pune PMRDA Lottery Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार, PMRDA कडून लॉटरी जाहीर; ठिकाण काय अन् अर्ज कसा कराल?

Pune PMRDA Lottery: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यात हक्काच्या घरांचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. PMRDA कडून ८३३ घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. ही कुठे आणि किती असणार आहेत आणि त्यासाठी कसा अर्ज करायचा घ्या जाणून....

Priya More

Summary:

  • पुण्यामध्ये हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार

  • PMRDA कडून ८३३ घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली

  • पुण्यातील प्राईम लोकेशनवर ही घरं असणार आहेत

पुण्यामध्ये हक्काचे घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बंपर लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. तब्बल ८३३ घरांसाठी ही लॉटरी निघाली आहे. पुण्यातील प्राईम लोकेशनवर ही घरं असणार आहेत. या लॉटरीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे. त्यामुळे ज्यांना पुण्यामध्ये स्वस्तात घर घ्यायचे आहे त्यांनी लवकराच लवकर अर्ज करावा.

मिळालेल्या माहितीनुसार, PMRDA ने अत्यल्प उत्पन्न गट (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) श्रेणीतील नागरिकांसाठी एकूण ८३३ घरांची लॉटरी जाहीर केली आहे. ऑनलाइन पद्धतीने ही लॉटरी काढण्यात आली आहे. अर्जदाराची नोंदणी, अर्ज भरणे आणि अनामत रक्कम देण्याची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे. महत्वाचे म्हणजे या लॉटरीअंतर्गत जी घरं आहेत ती पुण्यातील दोन मुख्य पेठांमध्ये असणार आहेत.

पुण्यातील पेठ क्रमांक १२ याठिकाणी ३४० घरं असणार आहेत. तर उर्वरीत ४९३ घरं ही पेठ क्रमांक ३० आणि ३२ मध्ये असणार आहेत. पेठ क्रमांक १२ मध्ये असणारी घरांमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी ५५ आणि अल्प उत्पन्न गटासाठी २८५ घरं असणार आहेत. तर पेठ क्रमांक ३० आणि ३२ मध्ये असणाऱ्या घरांमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३०६ आणि अल्प उत्पन्न गटासाठी १८७ घरं असणार आहेत.

पेठ क्रमांक १२ मधील अत्यल्प उत्पन्न गटातील पात्र लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २.५० लाख रुपयांचे अनुदान मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. PMRDAने अर्ज प्रक्रियेचे वेळापत्रक देखील जारी केले आहे. ऑनलाइन नोंदणीची सुरूवात १५ डिसेंबर म्हणजे सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून झाली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची आणि रक्कम स्वीकारण्याची प्रक्रिया १९ डिसेंबर म्हणजे शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होईल.

अर्जदारांना नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी २७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतची मुदत असणार आहे. ऑनलाइन रक्कम स्वीकारण्याची अंतिम तारीख २७ जानेवारी २०२६ रात्री ११.५९ वाजेपर्यंत असणार आहे. त्यासोबतच, बँक आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख २८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेची माहिती वाचून इच्छुकांनी घरासाठी अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism: इतिहास जपणारे किल्ले! हिवाळ्यात मुलांसोबत पुण्यातील या ५ किल्ल्यांवर नक्की फिरून या

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला धक्का; बडा नेत्यानं हाती घेतलं धनुष्यबाण, सतेज पाटलांना शिंदेंचा धोबीपछाड

Crime News: औरंगाबादमध्ये हत्याकांड! तरुणाला पकडून हातपाय बांधले, नंतर टोळक्यांनी क्रूरपणे संपवलं, भलतंच कारण समोर आलं

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये पर्यावरण प्रेमींनी घेतली राज ठाकरे यांची भेट

Horoscope Saturday: व्यवसायात होणार भरभराट, ५ राशींसाठी सुखाचा दिवस; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT