Pune MHADA Lottery: पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या ४१८६ घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी मुदत वाढवली; शेवटची तारीख काय?

Pune Mhada Lottery for 4186 Houses: पुण्यात घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी तुमच्याकडे आहे. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
Pune MHADA Lottery
Pune MHADA LotterySaam Tv
Published On
Summary

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी

पुण्यात म्हाडाच्या ४१८६ सदनिकांच्या अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

आता ३० नोव्हेंबरपर्यंत करु शकणार अर्ज

पुण्यात घर घेण्याचे स्वप्न अनेकांचे असते. परंतु पुणे शहरात घर घेणे हे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. त्यामुळे अनेकजण म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करतात. म्हाडामध्ये घर घेण्यासाठी आता मुदत वाढवून देण्यात आली आहे. आता तुम्ही ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करु शकतात.

पुण्यातील ४१८६ सदनिकांसाठी आतापर्यंत १,८२,७८१ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १,३३,८८५ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. दरम्यान, अजूनही अनेकांना अर्ज करायचे आहेत. यासाठीच ही मुदत वाढवून दिली आहे.

Pune MHADA Lottery
MHADA Lottery Cancel : म्हाडा विजेत्यांना मोठा दणका! घराचा ताबा न घेतल्याने हक्क रद्द होणार

पुण्यातील ४,१८६ घरांसाठी अर्ज (MHADA 4186 House Lottery)

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेत सोडत जाहीर केली आहे. एकूण ४,१८६ सदनिकांच्या विक्रीकरिता अर्ज मागवले आहेत. आता या घरांसाठी अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हाडाच्या या निर्णयामुळे पुणेकरांना किंवा पुण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना आणखी एक संधी मिळाली आहे.

म्हाडा मंडळातर्फे सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन संगणकीय सोडत ११ डिसेंबर, २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता काढण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. ०१ डिसेंबर २०२५ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल.

Pune MHADA Lottery
Mhada Lottery : ठाण्यात कुणाला लागली लॉटरी? म्हाडाच्या ५३५४ घरांची सोडत जाहीर, अशी पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

तांत्रिक कारणामुळे अर्जदारांना अडचणी

काही तांत्रिक कारणांमुळे बऱ्याच अर्जदारांची कागदपत्रे पडताळणीसाठी अडचणी आल्याने व अनेक नागरिकांची कागदपत्रांची पुर्तता झाली नव्हती. यामुळेच अर्ज करण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.त्यामुळे आता मुदत वाढवून दिली आहे. सोडतीसाठीचे नवीन वेळापत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

Pune MHADA Lottery
MHADA Homes: पुण्यातील हिंजवडी, वाकडमध्ये फक्त २८ लाखात घर; खरं की खोटं? म्हाडाने दिली माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com