BMC Housing Lottery: मुंबई महापालिकेच्या ४२६ घरांसाठी सोडत निघणार; या दिवशी लागणार लॉटरी

BMC Housing Lottery for 426 Houses: मुंबई महानगरपालिकेच्या ४२६ घरांसाठी सोडत आता लवकरच काढली जाणार आहे. ही सोडत २० नोव्हेंबरलाच होणार होती. मात्र, काही कारणांनी ही सोडत पुढे ढकलण्यात आली होती.
BMC Housing Lottery
BMC Housing LotterySaam Tv
Published On
Summary

मुंबई महानगरपालिकेच्या ४२६ घरांसाठी सोडत निघणार

याआधीच २० नोव्हेंबरला निघणार होती सोडत

मात्र, काही कारणांनी पुढे ढकलली होती सोडत

मुंबई महानगरपालिकेच्या ४२६ घरांसाठी सोडत पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आता या सोडतीसाठी मूहूर्त काढण्यात येणार आहे. ही सोडत २० नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार होती. मात्र, संगणकीय प्रणालीतील त्रुटी आणि सोडतीची अपुरी तयारी यामुळे सोडत रद्द करण्यात आली होती. ही सोडत आता लांबणी आली आहे.

BMC Housing Lottery
Vande Bharat Train : एका दिवसात राम लल्लाचं दर्शन घेऊन परतणं शक्य; आजपासून अयोध्या-दिल्लीसाठी वंदे भारत ट्रेन सुरू

संगणकीय प्रणालीतील त्रुटी दूर करण्यासाठी चाचणी सुरु आहे. यशस्वी चाचणी झाल्यानंतर देखरेख समितीची मान्यता घेतली जाईल. यानंतर सोडतीच्या तारखेची घोषणा केली जाणार आहे. यानंतर आठवड्याभरात सोडत काढण्याचे महानगरपालिकेचे नियोजन आहे.

विकास नियंत्रण नियमावली २०२४ च्या ३ (२०) अंतर्गत २४०, तर १५ टक्के एकात्मिक योजनेअंतर्गत १८६ अशा एकूण ४३६ घरांसाठी विक्री होणार आहे. या घरांची विक्री करण्यासाठी सोडतपूर्व प्रक्रिया राबवली. सोडतपूर्वी प्रक्रियेला खूप कमी प्रतिसाद मिळाला होता. ४२६ घरांसाठी २१३३ अर्ज प्राप्त झाले होते.

BMC Housing Lottery
MHADA: घराचं स्वप्न होईल पूर्ण; पुणे म्हाडानं सोडत अर्जाची मुदत वाढवली, काय आहे कारण ?

भांडूपमधील २४० घरांसाठी १२९ अर्ज मिळाले होते. मरोळमधील १४ घरांसाठी ९३७ अर्ज मिळाले होते. या अर्जांची छाननी करुन २० नोव्हेंबरला सोडत काढण्यात येणार होती. मात्र, ही सोडत काही कारणांनी रद्द झाली. दरम्यान, यामुळे २१३३ अर्जदारांना प्रतिक्षा आहे.

सोडतीसाठी संणकीय त्रुटी होत्या.या सर्व त्रुटी दूर करुन सोडतीची तयारी करण्याची सूचना पालिकेला दिली होती. यानंतर आता हे काम पूर्ण झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

BMC Housing Lottery
Nashik Mhada : प्राईम लोकेशन तब्बल ४०२ घरांसाठी लॉटरी, किंमत फक्त १४ लाख, वाचा A टू Z माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com