Pune News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: पोटातील गाठीऐवजी गर्भाशयच काढलं, ३५ वर्षीय महिलेची प्रकृती खालवली; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Uterus Removal Mistake Pune: पुण्यातील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिय करून महिलेच्या पोटातील गाठीऐवजी गर्भाशय काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरमई ४ डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Priya More

Summary -

• पुण्यातील मांजरी भागात धक्कादायक प्रकार घडला
• पोटातील गाठ काढण्याऐवजी महिलेचे गर्भाशय काढले
• खासगी रुग्णालयातील ४ डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल
• पोलिसांकडून पुढील तपास सुरू

सचिन जाधव, पुणे

पोटातील गाठीऐवजी महिलेचे गर्भाशयच काढल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. पुण्यातील मांजरी परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. महिलेवर एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रकरणी ४ डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. मांजरी पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहिनुसार, गर्भाशयातील गाठ काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी ३५ वर्षीय महिला खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. या महिलेच्या पोटातील गाठ काढण्याऐवजी तिचे गर्भाशय काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी मुंढवा रस्त्यावरील एका खाजगी रुग्णालयातील डॉ. संदीप कराड, डॉ. मंदार साहुजी, डॉ. निहाल शेख, डॉ. शेहजाद शेख आणि सूरज कांबळे यांच्याविरोधात रुग्णाचे जीवित धोक्यात आणल्याप्रकरणी कलम १२५ (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

केशवनगर येथील ३५ वर्षीय महिलेने मांजरी पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. ही घटना १५ सप्टेंबर २०२५ रोजी घडली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिला रुग्णाला प्रचंड त्रास होऊ लागला. त्यानंतर तपासणी केली असताहा प्रकार उघड झाला. पोलिसांनी पीडित महिलेने दिलेल्या या तक्रारीची गंभीर दखल घेऊन रुग्णालयाकडून वैद्यकीय कागदपत्रे, संमतीपत्र आणि शस्त्रक्रियेचा अहवाल मागवला.

तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची चौकशी समिती नेमली. समितीने या प्रकरणात वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी चार डॉक्टरांसह एकावर गुन्हा दाखल केला. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. डॉक्टरांनी केलेल्या चुकीमुळे महिलेला प्रचंड त्रास होऊ लागला आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Colombia Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT