Pune Hit And Run Case Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: मोठी बातमी! पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला तात्काळ जामीन, कारने चिरडत घेतला होता दोघांचा जीव

Pune Hit And Run Case: या अपघातामध्ये एक तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता. या मुलाविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. कोर्टात हजर करण्यात आले असता त्याला तात्काळ जामीन मंजूर झाला आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दोन जणांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला आहे. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवत त्याने एका दुचाकीला धडक दिली होती. या अपघातामध्ये एक तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता. या मुलाविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. कोर्टात हजर करण्यात आले असता त्याला तात्काळ जामीन मंजूर झाला आहे. काही अटींवर कोर्टाने त्याला जामीन दिला आहे. या मुलाच्या वडिलांविरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या भरधाव कारने दोन जणांना चिरडत त्यांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाला तात्काळ जामीन मिळाला आहे. या मुलाने पुण्यातील कल्याणीनगर परिसरामध्ये बेदरकारपणे, अती-वेगात कार चालवत दुचाकीला धडक देऊन २ जणांना चिरडले होते. या अपघातामध्ये एका तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता. रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा अपघात झाला होता. याप्रकरणी पुण्यातील येरवडा पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेऊन सुट्टीच्या कोर्टात हजर केले होते. एफआयआरमधील सर्व कलम जामीनपात्र असल्यामुळे काही अटींवर त्याला जामीन मंजूर केला.

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा हा मुलगा असून वेदांत अग्रवाल असे त्याचे नाव आहे. शनिवारी मध्यरात्री वेदांतने आपल्या आलिशान कारने दोघांना चिरडले. कार चालवाताना वेदांत मद्यधुंद अवस्थेत होता. वेदांतने दुचाकीला धडक दिली होती. या दुचाकीवरून जाणाऱ्या अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. हे दोघेही राजस्थानचे आहेत. अनिस आणि अश्विनी आपल्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणावरून ते दुचाकीवरून आपल्या मित्रांसोबत येरवड्याच्या दिशेला जात होते.

त्यावेळी वेदांत आपल्या पोर्से या आलिशान कारने याच रस्त्याने जात होता. वेदांत वेगाने कार चालवत होता. त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने दुचाकीसह इतर वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये अनिस आणि अश्विनीचा मृत्यू झाला. या अपघातानंतर अनिस आणि अश्विनीचा मित्र एकीब रमजान मुल्लाने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी वेदांतविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला ताब्यात घेतले. या अपघातानंतर काही नागरिकांनी वेदांतला चांगला चोप दिला होता. या हिट अँड रन प्रकरणामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT