Pune Shocking  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Shocking : पुणे हादरलं! आयटी इंजिनीअर तरुणाने कंपनीतच आयुष्य संपवलं, हिंजवडी आयटी पार्कात खळबळ

pune hinjewadi it park news : पिंपरी चिंचवडमधील आयटी इंजिनीअर तरुणाने कंपनीतच आयुष्य संपवलं. तरुणाच्या आत्महत्येच्या घटनेने हिंजवडी आयटी पार्कात खळबळ उडाली आहे.

गोपाळ मोटघरे

Pune News : पुण्यातील इंजिनीअर तरुण-तरुणींच्या आत्महत्येचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी एका इंजिनीअर तरुणीने आयुष्य संपवलं होतं. त्यानंतर आता एका आयटी इंजिनीअर तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तरुणाच्या आत्महत्येने हिंजवडी आयटी पार्कात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी आयटी पार्कमध्ये आयटी इंजिनीअर तरुणाने कंपनीतच आयुष्य संपवलं. पियुष अशोक कावडे असं आत्महत्या केलेल्या आयटी इंजिनीअर तरुणाचे नाव होतं. सोमवारी सकाळी कंपनीमध्ये मिटिंग सुरु होती. याचवेळी छातीत दुखत असल्याचे कारण देऊन पियुष मिटिंगमधून बाहेर पडला. त्यानंतर त्याने सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

पियुष आत्महत्या केल्याचं कळताच कंपनीसह हिंजवडी आयटी पार्कमध्ये खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पियुषचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याबाबत पोलिसांनी पियुषच्या कुटुंबीयांना माहिती दिली. या घटनेने त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

पियुष हा मूळचा नाशिकचा होता. तो हिंजवडीतील ॲटलास कॉपको ग्रुप या कंपनीत कार्यरत होता. एका महिन्यापूर्वी पियुष कंपनीत रुजू झाला होता. पियुषने टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पियुषच्या आत्महत्येने त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

Vidyadhar Joshi: 'सोनं खरेदी करणं म्हणजेच विनोद'; मोदींच्या आवाहनावर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

SCROLL FOR NEXT