IT employees from Hinjewadi hand over funds for the successful surgery of a 15-year-old road accident victim in Pune Ai
मुंबई/पुणे

परराज्यातील फुगे विकणाऱ्या अपघातग्रस्त मुलासाठी आयटी कर्मचारी धावले; स्वखर्चातून केली यशस्वी शस्त्रक्रिया

IT Employees Crowdfunding For Accident Victim In Hinjewadi: हिंजवडी आयटी पार्कमधील आयटी कर्मचाऱ्यांनी क्राऊड फंडिंग आणि सीएसआर निधीच्या माध्यमातून रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या 15 वर्षीय परराज्यातील बालकाचा जीव वाचवला.

Omkar Sonawane

गोपाल मोटघरे, साम टीव्ही

रस्ते अपघातात अतिशय गंभीर जखमी झालेल्या परराज्यातील बालकांसाठी आयटी पार्क हिंजवडी येथील आयटी एम्प्लॉयी सरसावले आहेत. क्राऊड फांडिंग आणि सीएसआर निधीच्या माध्यमातून हिंजवडी येथील आयटी एम्प्लॉईज ने पर राज्यातील एका अपघात गंभीर रित्या जखमी झालेल्या बालकाचे जीव वाचवले आहेत. विशाल कुमार वय पंधरा वर्षे असं पर राज्यातील अपघातग्रस्त बालकाचे नाव आहे. 25 जानेवारीला सकाळी दहा वाजता दरम्यान विशाल कुमार हा आयटी पार्क हिंजवडी मधील एका रस्त्यावर फुगे आणि खेळणी विकत असताना अचानक त्याच्या पायावरून एका मालवाहक वाहनाचे चाक गेल्याने तो गंभीर रित्या जखमी झाला होता. तसेच त्याच्या नातेवाईकाकडे पुरेशी पैसे नसल्याने कोणतेही खाजगी हॉस्पिटल त्याचं उपचार करण्यास पुढाकार घेत नव्हते.

मात्र, याबाबतची माहिती फोरम फोर आयटी एम्प्लॉईज अर्थात फाईट ला मिळताच फाईट च्या सदस्यांनी क्राउड फंडिंग सुरू केली, आणि बघता-बघता त्यांच्याकडे अडीच ते तीन लाख रुपये जमा झाले. तसेच त्यांनी इन्फोसिस या आयटी कंपनीच्या सीएसआर निधीतून अडीच ते तीन लाख रुपये विशाल कुमारच्या उपचारासाठी मिळवले आणि त्यांनी संचेती रुग्णालयामध्ये विशाल कुमार याच्यावर मिळालेल्या निधीच्या माध्यमातून यशस्वी शस्त्रक्रिया करून उपचार केले आहेत

त्यामुळे आज विशाल कुमार चे प्राण वाचले आहेत तसेच त्याचा पूर्णपणे निकामी झालेला पाय वाचवण्यात देखील हिंजवडी येथील आयटी एम्प्लॉईज ला यश आला आहे. पर राज्यातील एका अल्पवयीन अपघात ग्रस्त बालकाच पाय वाचवण्यासाठी हिजवडी येथील आयटी एम्प्लॉईज ने घेतलेल्या पुढाकाराने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तर कोणत्याही अपघातग्रस्त व्यक्तीला वाचवताना त्याचे उत्पन्नाचा दाखला आणि त्याचे इतर कागदपत्र पाहण्यापेक्षा फक्त त्याचा आधार कार्ड पाहून त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात यावे अशी विनंती फोरम फोर आयटी एम्प्लॉईज ने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापुरात भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT