Trimbakeshwar Temple: त्र्यंबकेश्वर मंदिर अडीच महिने राहणार बंद? नेमकं कारण काय?

Trimbakeshwar Temple Close: त्र्यंबकेश्वर मंदिर अडीच महिने राहणार बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामागचे कारण विश्वस्तांनी सांगितले आहे.
Trimbakeshwar Temple: त्र्यंबकेश्वर मंदिर अडीच महिने राहणार बंद? नेमकं कारण काय?
Trimbakeshwar Templesaam Tv news
Published On: 

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळाच्या कामांसाठी त्र्यंबकेश्वर मंदिराचे दर्शन अडीच महिने बंद ठेवण्याचा प्रस्ताव करण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळानं जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव केला असून गर्दीमुळे बांधकामात अडथळे आणि सुरक्षेचा धोका लक्षात घेता मंदिर बंद ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र, नित्यपूजा अखंडित सुरू राहणार असून, संयुक्त पाहणीनंतर या प्रस्तावावर अंतिम निर्णय होणार आहे.

सिंहस्थापूर्वी मंदिरात स्वतंत्र प्रवेशमार्ग आणि दर्शन रांग उभारण्याचे काम सध्या दोन शिफ्टमध्ये सुरू आहे. मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर भाविकांची मोठी गर्दी असल्याने बांधकाम साहित्य आणि अवजड यंत्रसामग्रीच्या वाहतुकीत अडथळे येत आहेत. गर्दीमुळे भाविकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. काम निर्धारित वेळेत पूर्ण होईपर्यंत मंदिरातील नियमित, सशुल्क आणि विशेष दर्शन अडीच महिन्यांसाठी स्थगित ठेवण्याची MSIDC ची विनंती आहे. दर्शन स्थगित ठेवले तरी मंदिरातील नित्यपूजा अखंडित सुरू राहणार आहे. देवस्थानने नियुक्त केलेल्या पुरोहितांनाच सुरक्षित मार्गाने प्रवेश देण्याचा प्रस्ताव आहे.

Trimbakeshwar Temple: त्र्यंबकेश्वर मंदिर अडीच महिने राहणार बंद? नेमकं कारण काय?
Trimbkeshwar मंदिर प्रवेश प्रकरणी SIT चौकशीला सुरुवात... SIT पथक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल!

याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. जिल्हा प्रशासन, कुंभमेळा प्राधिकरण आणि पोलिसांच्या संयुक्त पाहणीनंतर लेखी निर्णय अपेक्षित आहे. काम पूर्ण झाल्यावर प्रवेशमार्ग आणि आपत्कालीन मार्गाची सुरक्षितता तपासल्यानंतरच भाविकांसाठी दर्शन पुन्हा सुरू करण्याची MSIDC ची भूमिका आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन बंद ठेवण्याच्या प्रस्तावामुळे भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण, जिल्हा प्रशासन आणि कुंभमेळा प्राधिकरणाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Trimbakeshwar Temple: त्र्यंबकेश्वर मंदिर अडीच महिने राहणार बंद? नेमकं कारण काय?
Trimbakeshwar Temple: त्र्यंबकेश्वरमध्ये सुरक्षा रक्षकांची दादागिरी? मंदिरातच भाविकांना बेदम मारहाण; VIDEO व्हायरल

यासंदर्भात आता त्र्यंबकेश्वर मंदिर बंदच्या निर्णयावर विश्वस्तांचं स्पष्टीकरण आले आहे. आज दुपारी चार वाजता विश्वातांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात आहे. MSIDC ने दोन दिवसापूर्वी मंदिर बंद ठेवण्याचे पत्र दिले. त्र्यंबकेश्वर रोड, घाटांची कामे, अंतर्गत रस्ते सर्व काम ताबडतोब सुरू केल्याने कामामध्ये सुसूत्रता राहिली नाही त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. यामुळे भाविकांची मोठी अडचण झाली आहे त्यांना व्यवस्था कळत नाहीये याचा त्रास भाविकांना होत आहे आहे. 'शासनाला आमचा निर्णय आम्ही कळविलेला आहे भाविक आणि देव यांच्यात आम्ही येणार नाही. आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत मंदिर बंद ठेवायचे असेल तर ठराविक काळात कामांचे नियोजन कसे होणार याचा मास्टर प्लॅन आम्हाला द्यावा यानंतर निर्णय घेऊ.', असे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी सांगितले.

Trimbakeshwar Temple: त्र्यंबकेश्वर मंदिर अडीच महिने राहणार बंद? नेमकं कारण काय?
Nashik Trimbkeshwar Darshan: त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्त समितीचा मोठा निर्णय; ऑनलाईन पास देऊन दर्शन वेळेतच...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.