नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना सुरक्षा रक्षकांकडून मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. अवघ्या २४ तासांत मंदिरात मारहाणीच्या दोन घटना उघडकीस आल्या असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दिवाळीच्या सुट्यांमुळे मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली असताना घडलेल्या या वारंवारच्या प्रकारामुळे मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यानिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी रांग लावली आहे. अशातच भाविक आणि सुरक्षा रक्षक यांच्यात वाद झाला. आधी शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी भाविकांना मारहाण केली. या घटनेमुळे मंदिरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनेवरून भाविकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.