PUNE TRAGEDY: MOTHER AND TWO CHILDREN DIE AFTER JUMPING INTO WELL IN AMBEGAON TALUKA Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात भयंकर घडलं! आईने पोटच्या २ मुलांसह विहिरीत उडी मारून संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर

Pune Aambegaon Sucide News : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रुक गावात आई आणि दोन चिमुकल्यांच्या मृत्यूची हृदयद्रावक घटना घडली. कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रुक गावात धक्कादायक घटना

  • महिलेची दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या

  • आत्महत्येमागील नेमके कारण अस्पष्ट

  • कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

गोपाळ मोटघरे, पुणे

Pune Aambegaon 3 Sucide Case News Update पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रुक गावात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. एका महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेत जीवन संपवले. प्राथमिक अंदाजानुसार, कौटुंबिक वादातून महिलेने टोकाचा निर्णय घेतला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.अश्विनी तानाजी वाळकोळी, मुलगी अक्षिता आणि मुलगा कार्तिक अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गोहे बुद्रुक (Pune Gohe Budruk) येथील अश्विनी तानाजी वाळकोळीनी (Ashwini Walkoli Sucide) आपली मुलगी अक्षिता आणि मुलगा कार्तिक यांच्यासह गावातील एका विहिरीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने तिघांनाही विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

यानंतर अश्विनी वाळकोळी आणि त्यांच्या दोन्ही मुलांना तातडीने घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केले. या घटनेनंतर गोहे बुद्रुक गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, अश्विनी वाळकोळी यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. कौटुंबिक वाद, मानसिक तणाव किंवा इतर कोणते कारण या घटनेमागे आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला असून आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विधानपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

विमानतळावर रिल्स आणि फोटो काढण्यावर बंदी! नियम मोडल्यास मोबाईल जप्त होणार

Cancer patient mental health: धक्कादायक वास्तव! अर्ध्याहून अधिक कॅन्सरग्रस्त रूग्ण तणावाखाली, नव्या रिसर्चने चिंता वाढवली

Deool Band 2 Collection : स्वामींचा आशीर्वाद! 'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिसवर सुसाट; १४ व्या दिवशीही बक्कळ कमाई, प्रवीण तरडेंनी जमवला कोट्यवधींचा गल्ला

Fact Check : महात्मा गांधींचा फोटो नसलेल्या प्लास्टिकच्या नोटा RBI आणणार? 'त्या' दाव्याचे सत्य आले समोर

SCROLL FOR NEXT