ATS officials investigate the Pune hospital timer bomb case after arresting the accused from Nagpur. Saam TV marathi News
मुंबई/पुणे

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Hadapsar Hospital Incident : पुण्यातील हडपसर रुग्णालयात टायमर बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला एटीएसने नागपूरमधून ताब्यात घेतले. रुग्णालयातील वादातून संतापून बॉम्ब ठेवल्याची आरोपीने कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

ATS Cracks Pune Hospital Bomb Case latest News : पुण्यातील हडपसरमधील नामांकित रूग्णालयात टायमर बॉम्ब आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. ७ तासाचा टायमर लावून बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्यानंतर हडपसर आणि पुण्यात एकच खळबळ उडाली होती.हा बॉम्ब कुणी आणि का ठेवला? हे शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी दिवसरात्र एक केला. पुणे पोलीस आणि एटीएसकडून याचा संयुक्त तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला नागपूरमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. नागपूरहून बांगलादेशला पळून जाण्याच्या बेतात असणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीचे नाव शिवाजी राठोड असे आहे. त्याने रूग्णालयात बॉम्ब का ठेवला, त्याचे कारण सांगितले. राठोड याने गुन्ह्याची कबुली दिली, पण त्याचे शब्द ऐकल्यानंतर पोलीसही हादरले.

हडपसर रूग्णालयात बॉम्ब का ठेवला ?

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब ठेवल्या प्रकरणात एटीएस आणि पोलिसांनी शिवाजी राठोड याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी राठोड याची कसून चौकशी केली. त्याने बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणाची कबुली दिलीच. पण त्याने जे कारण सांगितले ते ऐकून धक्का बसला. रूग्णालयाच्या व्यवस्थापनातील काही कर्मचाऱ्यांची वाद झाला होता. त्या वादातून संतापलेल्या राठोड यांनी रूग्णालयात टामयर बॉम्ब ठेवल्याचे पोलिसांना सांगितल्याचे समोर आले. पुण्यातील हडपसर भागातील रुग्णालयात टायमर बॉम्ब आढळल्याने शहरात खळबळ उडाली होती.

बांगलादेशात पळण्यासाठी लढवली शक्कल, पण...

आरोपी शिवाजी राठोड हा मूळचा सोलापूरमधील आहे. तो पुण्यातील हडपसरमध्ये कामाला होता. रूग्णालयात खटके उडाल्यानंतर त्याने टायमर बॉम्ब ठेवला अन् पळ काढला होता. राठोड बंगालच्या दिशेने आणि तिथून पुढे निघून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून काढली राठोड याने देशातील विविध रेल्वे स्टेशनची तिकिटे काढली होती. पुणे एटीएसने राठोडला नागपूर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले.

राठोडला अटक होणार?

नागपूरमध्ये राठोड याला ताब्यात घेतल्यानंतर एटीएसने कसून चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली, त्यानंतर त्याला मेडिकलसाठी नेहण्यात आले आहे. मेडिकल झाल्यानंतर राठोड याला अटक होणार असल्याचे समजतेय. राठोड याला नागपूरमध्ये तात्काळ कोर्टात हजर केले जाणार आहे, त्यानंतर पुणे येथे पुढील तपासासाठी पुणे येथे नेण्याची प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT