Maval Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर पाेलीस सतर्क; पिस्तुलासह एकास अटक

त्याची चर्चा बाजारपेठेत रंगली हाेती.

दिलीप कांबळे

मावळ : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (lcb) वडगांव मावळ (maval) परिसरात गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह एकास अटक (arrest) केली आहे. काही दिवसांवर जिल्हा परिषद निवडणूक होणार असल्याने पुणे एलसीबी सतर्क झाली आहे. (maval crime news)

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या संशयित आराेपीचे नाव स्वप्नील मु-हे असे आहे. वडगांव बाजारपेठेत स्वप्नीलने कमरेला पिस्तुल लावले हाेते. त्याची चर्चा बाजारपेठेत रंगली हाेती.

त्यानंतर पाेलिसांनी संशयित आरोपी स्वप्नील यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी पिस्तुल आणि मॅगझीन (दोन जिवंत काडतुस) तसेच एक दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. काही दिवसांवर जिल्हा परिषद निवडणूक होणार असल्याने पुणे एलसीबीने गुन्हेगारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे अशी देखील चर्चा रंगली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जेलमधून गुंड लढले, निवडणूक जिंकले; गुंडांच्या गुंडगिरीला जनतेचा कौल

MMR मध्ये बविआनं रोखला भाजपचा रथ; वसई- विरारमध्ये बविआ अभेद्य

Explainer : मुंबईतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे धुंरधर कोण? यशामागे नेमकी काय होती रणनीती? वाचा

BMC Election: मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर; काँग्रेस, शिवसेना, RPIनंतर भाजपला संधी

मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर; तुमच्या वॉर्डाचा नगरसेवक कोण? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT