टोकियो : जपानच्या (japan) मुख्य दक्षिणेकडील क्युशू बेटावरील ज्वालामुखीचा रविवारी रात्री स्फोट झाला. त्यामुळे सर्वत्र राख आणि दगड उडाले. सुदैवाने या घटनेची झळ आजूबाजूच्या शहरांना बसलेली नाही. कोणतेही नुकसान झालेले नाही. दरम्यान स्थानिक रहिवाशांना (citizens) सुरक्षित ठिकाणी जा असा सल्ला मात्र प्रशासनाने दिला आहे. (japan volcano erupts marathi news)
जपानच्या हवामान विभागाच्या म्हणण्यानूसार साकुराजिमा ज्वालामुखीचा (sakurajima volcano) स्फोट रविवारी रात्री आठ वाजून पाच मिनीटांच्या सुमारास झाला, तेव्हा त्यातून निघणारे दगड अडीच किलोमीटर अंतरावर फेकले गेले. जपानच्या शासकीय दूरचित्रवाणीने प्रसारित केलेल्या वृत्तात ज्वालामुखीतून नारंगी ज्वाला आणि राखेचे प्लम्स उठताना दिसत होते.
उपमुख्य कॅबिनेट सचिव योशिहिको इसोझाकी (Yoshihiko Isozaki) यांनी नागरिकांचा जीव महत्वाचा असून आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांना आवश्यक असणारी सर्व यंत्रणा मदतीसाठी (help) तयार ठेवली आहे असे नमूद केले.
या संदर्भात कमाल पातळीचा पाचवा इशारा जारी केला आहे. दोन्ही शहरांतील 120 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. ज्वालामुखीतून बाहेर पडलेला खडक तीन किलोमीटरच्या परिसरात पडू शकतो आणि लावा, राख आणि सीअरिंग गॅस दोन किलोमीटरच्या परिसरात पसरू शकतो असा इशारा देखील नागरिकांना देण्यात आला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.