Pune girls fighting viral video x
मुंबई/पुणे

Pune : बॉयफ्रेंडला मेसेज का केला? शाळेच्या आवारात मुलींमध्ये फ्री स्टाईल मारामारी, पुण्यातला Video Viral

Pune News : पुण्यातील येरवडा परिसरात एका शाळेच्या आवारात काही मुलींनी राडा घातल्याचे पाहायला मिळाले. शुल्लक कारणामुळे दोन गटात हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Yash Shirke

  • पुण्यात शाळेच्या आवारात बॉयफ्रेंडवरून मुलींमध्ये भांडण झाले.

  • मारामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune City : पुण्यात बॉयफ्रेंडवरुन मुलींमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले. बॉयफ्रेंडला मेसेज का केला यावरुन मुलींमध्ये जुंपली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुण्याच्या एका शाळेच्या आवारात सदर प्रकार घडला. काल रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातील येरवडा परिसरातील नेताजी शाळा परिसरात रात्री साडेदहाच्या सुमारास राडा झाल्याचे पाहायला मिळाले. माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का करतेस? असे म्हणत दोन मुलींमध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर आणखी मुली भांडणात सामील झाल्या. शुल्लक कारणांवरुन दोन मुलींच्या टोळ्या भिडल्या. नेताजी शाळेच्या आवारात हा प्रकार घडला.

एकमेकींच्या झिंज्या ओढणे, लाथाबुक्क्या मारणे, एकमेकींनी गलिच्छ शिव्या देणे असा प्रकार सुरु होता. या मुली इतक्या घाणेरड्या पद्धतीने भांडण होत्या की ते पाहून आसपासच्या लोकांच्या अंगावर काटा आला. शिक्षण, संस्कार, शिस्त यांची राख करुन या मुली रस्त्यावरच तमाशा करत आहेत, असे म्हणत स्थानिकांनी संताप व्यक्त केला. येरवडा पोलिसांनी या मुलींना लवकरच धडा शिकवावा अशी मागणी होत आहे.

कोंढव्या वाहनांची तोडफोड आणि दहशतीचा प्रयत्न

कोढव्यातील मिठानगर येथे धक्कादायक प्रकार घडला. अल्पवयीन मुलांमध्ये किरकोळ कारणांवरुन वाद झाला. याच्या रागात मुलांच्या टोळक्याने रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. मुलांनी ३ रिक्षा आणि २ कार अशा वाहनांच्या काचा फोडून परिसरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TET परिक्षेची तयारी; नोकरी गमावण्याची भीती, सरकारी शिक्षकाने राहत्या घरात आयुष्य संपवलं, विजेच्या तारेनं...

Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळत नसल्यानं नैराश्य, विषारी औषध पिऊन मराठा आंदोलकानं आयुष्य संपवलं

Narendra Modi : मी भगवान शिवाचा भक्त, सगळं विष गिळून टाकलंय; PM नरेंद्र मोदी आसामध्ये नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Live News Update: कांदीवलीत भारत - पाक मॅचविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात आले दोन-दोन जॉली; अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांनी स्पर्धकांची घेतली शाळा

SCROLL FOR NEXT