Pune GBS Update  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune GBS: शिक्षणासाठी पुण्यात आली अन् GBS च्या विळख्यात अडकली, २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू

Pune Girl Died Due To GBS: पुण्यामध्ये शिक्षणासाठी आलेल्या एका तरुणीचा जीबीएस आजारामुळे मृत्यू झाला आहे. सिंहगड परिसरात ती नातेवाईकांकडे राहत होती. पुण्यामध्ये आतापर्यंत जीबीएस आजाराने १० जणांचा बळी घेतला.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये जीबीएस आजाराने सर्वांचे टेन्शन चांगलेच वाढवले आहे. पुण्यामध्ये जीबीएसने आणखी एकाचा बळी घेतला आहे. २१ वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. किरण देशमुख असं या तरुणीचे नाव असून तिच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. या तरुणीच्या मृत्यूनंतर पुण्यात जीबीएस आजारामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १० वर पोहचली आहे.

बारामतीची किरण राजेंद्र देशमुख (२१ वर्षे) या तरुणीचा जीबीएस आजाराने मंगळवारी मृत्यू झाला. गेल्या तीन आठवड्यापेक्षा अधिक काळापासून तिची या आजाराशी झुंज सुरू होती. बारामतीतील किरण ही सिंहगड परिसरात शिक्षणाच्या निमित्ताने नातेवाईकांकडे राहत होती. याच दरम्यान तिला जीबीएस आजाराची लागण झाली होती. तिच्यावर उपचार सुरू होते पण उपचारादरम्यान तिने प्राण सोडले.

किरण देशमुख ही शिक्षणाच्या निमित्ताने सिंहगड परिसरात नातेवाईकांकडे राहत होती. किरण राहत असलेल्या परिसरात जीबीएस आजाराचे अनेक रुग्ण आढळले आहेत. अशामध्ये तिला देखील जीबीएसची लागण झाली. आजारी पडल्यानंतर किरण आपल्या आई-वडिलांकडे म्हणजे बारामतीला गेली. जुलाब आणि अशक्तपणामुळे बारामतीत कुटुंबांकडे आलेल्या किरणला तिच्या कुटुंबीयांनी बारामतीतील तज्ज्ञांना दाखवले.

किरणवर बारामतीत उपचार करण्यात आले पण तिला काहीच फरक पडला नाही. तेव्हा तज्ज्ञांना तिच्या लक्षणावरून जीबीएस आजाराबाबत शंका आली आणि त्यांनी किरणला पुण्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिला तातडीने पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. २७ जानेवारीपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र तिची प्रकृती अधिकच खालावत गेल्याने तिचा मंगळवारी रुग्णालयात मृत्यू झाला.

दरम्यान, पुण्यामध्ये १८३ रुग्णांना जीबीएसची लागण झाली आहे. २८ रुग्ण संशयित आहेत. पुण्यात आतापर्यंत १० जणांचा या आजाराने मृत्यू झाला. ४२ रुग्ण पुणे मनपा, ९४ रुग्ण हे नव्याने पुणे मनपा अंतर्गत समाविष्ट झालेल्या गावातील आहेत. ३२ रुग्ण पिंपरी-चिंचवड आणि ३३ रुग्ण पुणे ग्रामीण तसंच १० इतर जिल्ह्यातील आहेत. यापैकी १३९ रुग्णांना डीस्चार्ज देण्यात आला आहे. ३९ रुग्ण आयसीयूमध्ये तर १८ व्हेंटिलेटरवर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT