GBS Update : पुण्यात GBSची दहशत वाढली, आणखी एकाचा मृत्यू; शहरात भीतीचं वातावरण| Video

Pune GBS One Dead : आरोग्य विभागाच्या अहवालात ९ मृत्यूंपैकी ४ मृत्यू जीबीएस आणि ५ संशयास्पद मृत्यू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वाघोली येथील ३४ वर्षीय व्यक्तीला आधी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पुणे : राज्यात जीबीएसच्या रूग्णांची संख्या सध्या २१० इतकी आहे. अनेक रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ही चांगली बाब असली तरी जीबीएसमुळे झालेल्या मृत्यूची संख्या ९वर पोहोचली आहे. पुणे जिल्ह्यातील आणखी एका रूग्णाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. काल सोमवारी पुणे शहरात आणखी एका मृत्यूची नोंद झाल्याने जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ९वर पोहोचली आहे.

आरोग्य विभागाच्या अहवालात ९ मृत्यूंपैकी ४ मृत्यू जीबीएस आणि ५ संशयास्पद मृत्यू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वाघोली येथील ३४ वर्षीय व्यक्तीला आधी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी त्याला ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. रुग्णाला ३ ते ८ फेब्रुवारी या काळात रुग्णाच्या मानेच्या, श्वसनाच्या, चेहऱ्याच्या आणि गिळण्याच्या स्नायूंची शक्ती कमी झाली. त्याला ७ फेब्रुवारी रोजी श्वासोच्छ्वसाच्या आणि मानेच्या स्नायूंचा अर्धांगवायू झाला. रुग्णावर जीबीएसचे सर्व उपचार सुरू होते. पण दुर्दैवाने १५ फ्रेब्रुवारी रोजी सायंकाळी रुग्णाला मृत घोषित करण्यात आले.

JBS Virus Updates News
५५ हजार अवैध लाडकी बहिणींचे अर्ज रद्द, आठवा हप्त्यापासून वंचित, पडताळणीनंतर लाडकीचे अर्ज बाद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com