Maharashtra GBS Update: भय इथले संपले नाही! GBS ने कोल्हापुरात घेतला दुसरा बळी, राज्यातील मृतांचा आकडा १२ वर

Guillain-Barre Syndrome: जीबीएस आजाराने कोल्हापूरमध्ये दुसरा बळी घेतला आहे. रेंदाळ ढोणेवाडी येथे राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीचा जीबीएसमुळे मृत्यू झाला. राज्यातील मृतांचा आकडा १२ वर गेला आहे. त्यामुळे भीती आणखी वाढली आहे.
Kolhapur GBS: पुणे, मुंबईनंतर नागपूरमध्ये जीबीएसचा पहिला बळी
Nagpur GBSSaam Tv
Published On

राज्यात जीबीएस आजाराने टेन्शन वाढवलं आहे. जीबीएसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढते तसंच मृतांचा आकडा देखील वाढत आहे. अशामध्ये कोल्हापूरमध्ये जीबीएसने दुसरा बळी घेतला आहे. जीबीएसची लागण झालेल्या वृद्ध व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा १२ वर पोहचला आहे. शनिवारी सांगलीमध्ये दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, जीबीएस आजाराने कोल्हापूरमध्ये दुसरा बळी घेतला आहे. रेंदाळ ढोणेवाडी येथे राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीचा जीबीएसमुळे मृत्यू झाला. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात या व्यक्तीवर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर कोल्हापूरमधील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात जीबीएसच्या ५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामधील एक जण व्हेंटिलेटरवर आहे.

पुण्यामध्ये जीबीएसने टेन्शन वाढलं आहे. जीबीएसच्या बाधित रुग्णांची संख्या २०८ वर पोहचली आहे. पुण्यात आज नव्याने एक बाधित रुग्ण सापडला. जीबीएस आतापर्यंत १२४ बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून आज नव्याने एक रुग्ण सापडला. त्यामुळे बाधित रुग्णसंख्या २०८ वर पोहोचली असून त्यातील १८१ रूग्णांची जीबीएसचे निदान झाले आहे. शहरात दररोज जीबीएस बाधित रुग्णसंख्या वाढत असून रविवारी तपासणी होत नसल्यामुळे बाधित रुग्णसंख्य कमी दिसते.

त्यामुळे रविवार वगळता दररोज चार ते पाच जीबीएस बाधित सापडत आहे. व्हेंटिलेटर आणि अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्यांची संख्याही दररोज कमी-अधिक होत आहे. दरम्यान, पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातही रुग्ण आढळत आहे. आतापर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यांत २०८ जीबीएस बाधित रुग्णांपैकी ४२ रुग्ण पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील असून सर्वाधिक रुग्णसंख्या ९४ ही समाविष्ट गावांतील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com