GBS and Chicken Connection Saam Tv
मुंबई/पुणे

Pune GBS: पुण्यात जीबीएसचा उद्रेक कशामुळे झाला? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

GBS and Chicken Connection: पुण्यात उद्रेक झालेल्या जीबीएसमागचे कारण समोर आले आहे. जीबीएस पसरण्यामागे कोंबड्या जबाबदार आहेत. कोंबड्यामुळे जीबीएसचा उद्रेक झाल्याचा संशोधनातून प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये पसरलेल्या गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे जीबीएस आजाराने सर्वांची चिंता वाढवली होती. या आजाराचा उद्रेक इतका झाला की त्याने अनेकांचे बळी घेतले होते. फक्त पुणेच नाही तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये देखील हा आजार पसरला होता आणि त्यामुळे अनेकांचा जीव गेला. जीबीएसचा उद्रेक नेमका कशामुळे झाला असे प्रश्न अनेकांना पडले होते पण त्याचे उत्तर अद्याप समोर आले नाही. यावर संशोधन देखील सुरू आहे. सुरूवातीला दुषित पाण्यामुळे पुण्यात जीबीएसचा उद्रेक झाला असल्याचे म्हटले जात होते. पण आता संशोधनातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कोंबड्यामुळे जीबीएसचा उद्रेक झाल्याचा संशोधनातून प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. याबाबतचा अंतिम निष्कर्ष येणं अजून बाकी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात उद्रेक झालेला जीबीएस आजार कोंबड्यांमुळेच झाला असा प्राथमिक निष्कर्ष राष्ट्रीय विषाणू संस्थेने दिला आहे. या निष्कर्षामुळे पुणे महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण आणि क्लोरिनेशन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याबाबत अधिक संशोधन सुरू असून लवकरच त्याचे अंतिम निष्कर्ष हाती येणार आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. नवीन कुमार यांनी ही माहिती दिली. पुणे शहरात जीबीएसच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. ९ जानेवारीपासून पुण्यात जीबीएस या आजाराचा उद्रेक झाला होता. या आजाराने पुण्यात अनेकांचा बळी घेतला होता.

पुण्यात ९ जानेवारीपासून जीबीएसचा उद्रेक झाला होता. या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढतच होती. पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावरील नांदेड गावातून या आजाराला सुरूवात झाली. पुण्यात जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण हे याच गावात आढळले होते. पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या २०२ इतकी होती. तर जीबीएसमुळे १२ जणांचा मृत्यू झाला होता. पुण्यात आढळलेल्या २०२ रुग्णांपैकी पुणे महापालिका हद्दील ४६ रुग्ण, महापालिकेत नव्याने समाविष्ट गावातील ९५ रुग्ण, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ३४ रुग्ण, पुणे ग्रामीणमधील ४० रुग्णांचा समावेश होता.

महत्वाचे म्हणजे, ९ जानेवारीपासून पुण्यात उद्रेक झालेल्या जीबीएसमुळे सगळीकडे भीतीचे वातावरण होते. रुग्णसंख्या सातत्याने वाढ होती. पण १८ फेब्रुवारीपासून पुण्यात एकही जीबीएसचा रुग्ण आढळला नाही. हा आजार सुरूवातीला दुषीत पाण्यामुळे होत होता असे म्हटले जात होते. पण पुणे महानगर पालिकेकडून या आजाराचा उद्रेक होण्यामागचे कारण अद्याप जाहीर करण्यात आले नाही. पण आता राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने हा आजार कोंबड्यामुळे पसरल्याचा प्राथमिक निष्कर्ष व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT