Pune Manache Ganpati Pratishthapana Time Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Ganpati: आतुरता गणरायच्या आगमनाची! पुण्यातील मानाच्या ५ गणपतींच्या प्राणप्रतिष्ठापनाची वेळ ठरली

Pune Manache Ganpati Pratishthapana Time: पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींच्या प्राणप्रतिष्ठापनाची वेळी ठरली आहे. कोणत्या गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना कधी होणार आहे हे घ्या जाणून...

Priya More

Summary -

  • पुण्यातील ५ मानाच्या गणपतींच्या प्राणप्रतिष्ठेची वेळ निश्चित झाली.

  • कसबा गणपतीची सकाळी ११.३७ वाजता, तांबडी जोगेश्वरीची दुपारी १२.११ वाजता प्रतिष्ठापना होणार.

  • गुरुजी तालीम गणपतीची दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी प्राणप्रतिष्ठापना होणार.

अक्षय बडवे, पुणे

लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता सगळ्यांना लागली आहे. गणपती आगमनासाठी अवघे काही तास उरले आहेत. सगळ्या गणेशोत्सव मंडळांकडून जोरदार तयारी सुरू आहे. पुण्यातील गणेशोत्सवाची फक्त राज्यभर नाही तर जगभरात चर्चा होते. पुण्यातील गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्त मोठ्या संख्येने येतात. अशातच पुण्यातील ५ मानाच्या गणपतींच्या प्राणप्रतिष्ठापनाची वेळ ठरली आहे. कोणत्या गणपती बाप्पाची कोणत्या शुभमुहूर्तावर प्रतिष्ठापना होणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत...

लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. मानाच्या गणपतीसह शहरातील प्रमुख सार्वजनिक मंडळाकडून तयारी पूर्ण झाली आहे. आकर्षक देखावे आणि सजावटीसाठी पुण्यातल्या गणेश मंडळांची ख्याती सातसमुद्रापार पोहचली आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा उत्साह पुणेकरांसहित सर्व गणेश भक्तांमध्ये पाहायला मिळत आहे. पुणे शहरातील प्रमुख आकर्षण म्हणजे मानाचे गणपती यासोबतच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा देखावा. यंदा मानाच्या गणपतीसह इतर सर्व मंडळांनी लाडक्या बाप्पासाठी आकर्षक सजावट केली आहे. येत्या बुधवारी म्हणजेच २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने या मंडळाकडून बाप्पाची प्राणप्रतिष्ठेची वेळ सुद्धा आता निश्चित करण्यात आली आहे.

मानाचा पहिला कसबा गणपती -

मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची आगमन मिरवणूक सकाळी ८ वाजता सुरू होईल. मिरवणुकीत प्रभात बँड पथकासह ढोलताशा पथकसुद्धा वादन करतील. सकाळी ११. ३७ मिनिटांनी गणपतीची प्राणप्रतिष्ठा आध्यात्मिक गुरु आणि लेखक स्वामी सवितानंद यांच्या हस्ते संपन्न होईल.

मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळ -

यंदाचे हे मंडळाचे १३३ वे वर्षे आहे. आगमनाची मिरवणूक सकाळी १० वाजता नारायण पेठेतील केळकर रस्त्यावरून निघेल. दुपारी १२.११ वाजता सनई-चौघड्याच्या साथीने प्राणप्रतिष्ठापना प.पू. योगश्री श्री शरदशास्त्री जोशी यांच्या हस्ते होणार आहे. यंदाच्या वर्षी साडेतीन शक्तीपीठांपैकी पहिलं कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराच्या प्रतिकृती मंडळाकडून साकारण्यात आली आहे.

मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ -

पुण्याचा राजा मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाचे यंदाचे १३९ वे वर्षे असून बापाच्या आगमनाची मिरवणूक आकर्षक फुलांच्या रथातून बुधवारी सकाळी ११ वाजता सुरू होईल. प्रतिष्ठापना दुपारी २ वाजून ३५ मिनिटं यावेळी संपन्न होणार आहे.

मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती मंडळ -

मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती मंडळाचे यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्षे असून बुधवारी दुपारी १२.१५ वाजता आळंदी देवस्थानाचे प्रमुख विश्वस्त निरंजन नाथ महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे. तुळशीबाग मंडळाकडून यंदा मथुरेचे वृंदावन साकारले आहे. उत्सव काळात मंडळाकडून अभिषेक, गणेश याग ब्रम्हणस्पती याग, सत्यविनायक पूजा से विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहे.

मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा -

सकाळी ९ वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीची मिरवणूक सुरुवात होईल. सकाळी १० ते ११ यावेळेत रोहित टिळक यांचे पुत्र रौनक टिळक यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली जाईल. सकाळी ११ वाजता बाप्पाच्या महाआरती चे नियोजन केलं असल्याची केसरी गणेशोत्सवाचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी दिली. तसेच संध्याकाळी ६.३० वाजता केसरी वाड्यात गीत रामायणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्ट -

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयोग करून मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षी गणेशोत्सवात केरळ मधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी मध्य प्रदेश चित्रकूट येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरु श्री रामानुजाचार्य श्री झालरिया पिठाधीश्वर श्री श्री परमपूज्य स्वामी घनश्यामचार्य महाराज च्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मंदिरावरील विद्युत रचनेचे उद्घाटन संध्याकाळी ७ वाजता होईल. मुख्य मंदिरापासून सकाळी आकर्षक रथातून बापाची आगमन मिरवणूक सुरू होईल.

अखिल मंडई मंडळ -

फुलांनी सजलेल्या भव्य मयूर रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननची आगमन मिरवणूक संपन्न होणार आहे. बुधवारी सकाळी १० वाजता आगमन मिरवणुकीला सुरुवात होईल आणि गणेशाची प्रतिष्ठापना दुपारी १२ वाजता युनिटी एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड चेअरमन नवीनचंद्र विप्रदास मेनकर यांच्या हस्ते होणार आहे. मंडळाचे हे १३२ वर्षे असून यंदाच्या गणेशोत्सवात "कृष्णकुंज" ही आकर्षक सजावट साकारण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महाविकास आघाडीला मोठं खिंडार, अनेक बडे नेते, संरपंचांसह पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Asim Sarode On Atharva Sudame: अथर्व सुदामेसाठी असीम सरोदे मैदानात, थेट राज ठाकरेंना लावला फोन| पाहा व्हिडिओ

Pune Traffic: गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीत मोठे बदल; शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहतूक बंद

Indian Festivals: दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत; वाचा मुहूर्त, वार आणि तारीखसह सणांची यादी

Maharashtra Politics: निवडणुकीआधीच महायुतीत संघर्ष? शिंदेंच्या खात्यावर फडणवीस नाराज?

SCROLL FOR NEXT