विश्वभूषण लिमये, सोलापूर प्रतिनिधी
Pune Gangster Shahrukh Encounter at Solapur : पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. लांबोटी येथे घरात लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी ठार केलेय. शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख असं २३ वर्षीय पुण्यातील सराईत गुंडाचे नाव आहे. आज सोलापुरातल्या लांबोटी जवळ पुणे गुन्हे शाखेनं त्याचा एन्काऊंटर केला. शाहरुखवर पुण्यात अनेक गुन्ह्याची नोंद होती. शाहरूखला अटक करण्यासाठी पुणे पोलिस सोलापूरमध्ये दाखल झाले होते, पण शाहरूखने पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी प्रतिहल्ला करत शाहरूखचा एन्काऊंटर केला.
सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथे पुणे शहर पोलीस एका गुन्ह्या संदर्भात आरोपी शाहरूखला अटक करण्यासाठी आले होते. पण आरोपी शाहरूखने फायरिंग केल्यामुळे पुणे शहर पोलिसांकडून लांबोटीतील एका घरात फायरिंग केली आहे. सदर आरोपी पोलिसांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. पोलिसांनी त्याला उपचारासाठी सोलापूरमधील सरकारी रूग्णालयात दाखल केले होते. पण उपचारादरम्यान शाहरूखचा मृत्यू झाला. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकासह मोहोळ पोलिसांनी शाहरूखला पडकण्यासाठी सापळा रचला होता. पण शाहरूखने फायरिंग केली.
शाहरुख उर्फ अट्टी शेख याच्यावर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत. शाहरूखचा शोध पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. शाहरूखने पोलिसांपासून वाचण्यासाठी पुण्यातून पळ काढला. काही दिवापासून तो सोलापुरातील लांबोटी गावाजवळ लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याला अटक करण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक मध्यरात्री लांबोटी येथे आले होते. शाहरूख लपलेल्या घरावर पोलिसांनी छापा मारला. पण त्यावेळी आरोपी शाहरुख शेख यांने पोलिसांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती मिळाली. या गोळीबारला प्रत्युत्तर देताना शाहरुख उर्फ अट्टी शेख गंभीर जखमी झाला. गंभीर अवस्थेत त्याला सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
शाहरुख शेख याच्यावर पुणे शहर आणि जिल्ह्यातील हडपसर,वानवडी, कोंढवा, काळेपडळ या पोलीस ठाण्यांमधून सुमारे 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मकोकाच्या गुन्ह्यात शेख हा फरार होता. शेख याच्यावर आर्म अक्टचे जवळपास पाच गुन्हे दाखल आहेत. पुणे क्राईम ब्रांच च्या पथकाला शेख हा लांबोटी येथील त्याच्या नातेवाईकांच्या घरी असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पुणे क्राईम ब्रांचच्या पथकाने मोहोळ पोलीस ठाण्याच्या मदतीने लांबोटी येथे शनिवारी रात्री शेख याला पकडण्यासाठी संयुक्त मोहीम राबवली होती. यावेळी पोलीस आपल्याला पकडण्यासाठी आल्याचे दिसताच शेख याने पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी प्रतिउत्तर दाखल केलेल्या गोळीबारामध्ये शेख याचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मोहोळ पोलीस ठाणे येथे भेट दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.