Ganesh Kale Murder Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

Ganesh Kale Case : पुण्यात पुन्हा गँगवॉर! गणेश काळेवर गोळ्या झाडतानाचा CCTV व्हिडिओ समोर

Ganesh Kale Andekar Komkar gang rivalry case : कोंढवा परिसरात दिवसाढवळ्या गणेश काळेची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या. आंदेकर-कोमकर टोळी संघर्षातून ही हत्या झाल्याचा संशय. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून दोन पिस्तुलं जप्त. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

Namdeo Kumbhar

Ganesh Kale Andekar Komkar gang rivalry case : पुण्यात पुन्हा एकदा गँगवारचा थरार घडला. भरदिवसा कोंढवा परिसरात गणेश काळे (Ganesh Kale Murder) याची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून (Andekar Komkar Gang War) गणेश काळेची हत्या झाल्याचे समोर आले आहे. हत्या केल्यानंतर चारही आरोपी पळून गेले होते. गणेश काळे याच्यावर गोळ्या झाडतानाचा आरोपीचा व्हिडिओ समोर आला आहे.

गणेश काळे याच्यावर गोळ्या झाडतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. गणेश काळे रिक्षामध्ये बसला होता. त्यावेळी आरोपीने पाठीमागून त्याच्यावर धाडधाड गोळ्या धाडल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतेय. गणेश काळे याच्यावर गोळ्या झाडल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. याचाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालाय.

गणेश काळे या तरुणावर दुचाकी वर येत काही जणांनी गोळीबार केला आणि यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी खडीमशीन चौकात घडली आहे. पुण्यातल्या खडीमशीन चौक ते बोगदेव घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती पेट्रोल पंपाजवळ गोळीबार झाला. गोळीबारानंतर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आलेले आहे. हे टोळी युद्धातून झाल्याची माहिती समोर येत आहे.

आरोपींना खेड शिवापूर परीसरातून चारही आरोपींना कोंढवा डी बी पथकाकडून अटक करण्यात आली. गुन्ह्यात वापरलेले दोन पिस्तूल आणि दोन हत्यार जप्त करण्यात आली. अमन महेबुब शेख,22 वर्ष, अरबाज अहमद पटेल आणि दोन अल्पवयीन आरोपी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT