Aayush Komkar Case Saam Tv
मुंबई/पुणे

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Vanraj Aandekar: वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यात आला आहे. आंदेकर टोळीने वनराजची हत्या करणाऱ्या गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरची हत्या केली. शुक्रवारी गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली.

Priya More

पुण्यात गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी गोळीबाराची भयंकर घटना घडली. वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आंदेकर टोळीचा मोरक्या आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकरची हत्या एका वर्षापूर्वी करण्यात आली होती. १ सप्टेंबरला त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणामुळे पुणे हादरले होते. बरोबर एका वर्षानंतर वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यात आला. आंदेकर टोळीने आयुष कोमकरची हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

वनराज आंदेकरचा मारेकरी गणेश कोमकरच्या २० वर्षीय मुलगा आयुष कोमकरची शुक्रवारी रात्री हत्या करण्यात आली. क्लासवरून घरी जात असताना ही घटना घडली. आयुष राहत असलेल्या लक्ष्मी कॉम्पलेक्स या बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये आपल्या मित्रांशी बोलत होता. त्यावेळी दोन जण त्याठिकाणी आले आणि त्यांनी आयुषवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामध्ये आयुषला ३ गोळ्या लागल्या. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. आयुष पदवीचे शिक्षण घेत होता.

१ सप्टेंबर २०२४ रोजी वनराज आंदेकरची हत्या करण्यात आली होती. नाना पेठेत डोके तालीम परिसरात वनराजवर कोयत्याने सपासप वार करून आणि गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वनराजचा जागीच मृत्यू झाला होता. नातेवाईकांकडूनच वनराजची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सोम्या गायकवाड, गणेश कोमकर, त्याच बायको म्हणजे वनराजची बहिणी आणि इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.

वनराजच्या हत्येमुळे आंदेकर टोळीला मोठा धक्का बसला होता. त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी आंदेकर टोळीच्या सदस्यांनी शस्त्रपूजन करून त्याच्या खुनाचा बदला घेण्याची शपथ घेतली होती. बदला घेण्याची आंदेकर टोळीने शपथ घेतली असल्याची माहिती पुणे शहर पोलिस दलातील अधिकाऱ्यांना आणि गुन्हे शाखेला होती. आंदेकर टोळीने वनराजच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होत असताना भारती विद्यापीठ परिसरात एकाच्या हत्येचा कट रचला होता. पण हा कट भारती विद्यापीठ पोलिसांमुळे उधळून लावण्यात आला होता. पण त्यानंतर या आंदेकर टोळीने कट रचून आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

SCROLL FOR NEXT