Pune Ganeshotsav Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Ganeshotsav: पुण्यातील विसर्जन मिरवणुकीच्या वादाची ठिणगी २५ तारखेला शमणार, पोलिस आयुक्तांची ग्वाही

Pune Ganeshotsav Visarjan: पुण्यातील विसर्जन मिरवणुकीबाबत पोलिस आयुक्तांची बैठक झाली. याबाबतचा अंतिम निर्णय येत्या २५ तारखेला होणार आहे.

Akshay Badve

२५ तारखेपर्यंत पुण्यातील विसर्जन मिरवणुकीच्या बाबत असलेल्या प्रश्नांचे निरासरण होईल अशी ग्वाही पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज दिली. पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडलेल्या बैठकीला पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते.

गणेशोत्सवातील गर्दीचे नियोजन, लक्ष्मी रस्त्यावरून संपन्न होणारी विसर्जन मिरवणूक, मानाच्या गणपतीची मिरवणूक आणि त्यांचे नियोजन, शहरातील इतर गणेश मंडळांना मिळणारा मान, ढोल ताशा पथकाची मर्यादा अशा अनेक विषयांवर गणेश मंडळाच्या प्रतिनिधींनी मतं व्यक्त केली.

यावेळी बोलताना गरुड गणपती मंडळाचे अध्यक्ष सुनील कुंजीर म्हणाले, "आम्ही विसर्जन मिरवणुकीला सकाळी ७ वाजता निघणार आहोत. पुढे जाऊन आम्ही मानाचे गणपती यांच्यासाठी थांबू. मान हा गणेश मंडळांना आहे पण त्यातल्या कार्यकर्त्यांना नाही. अनेक गणेश मंडळाचे कार्यकर्ते दादागिरी करतात पण ती आम्ही आता खपवून घेणार नाही."

बाल विकास मंडळ चे विकास गुंड म्हणाले, "गेल्या १० वर्षांपासून विसर्जन मिरवणूक व्यवस्थित पार पडली पण आता का माशी शिंकली माहिती नाही. गेल्या ४ ते ५ वर्षात कोणाचा इगो दुखावला आहे हे माहिती नाही. आम्ही अन्याय सहन करणार नाही.

मुठेश्वर मंडळाचे गणेश भोकरे म्हणाले, "पुण्यातील मानाचे आणि प्रमुख मंडळ सोडले तर आमच्यासारख्या गणेश मंडळांना काही किंमत मिळत नाही. आमच्या सारख्या मंडळांच्या सुद्धा दुःख जाणून घ्या. आम्हाला व्हॅल्यू नाही का, वी आय पी ट्रिटमेंट फक्त त्यांनाच का?"

पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यावेळी म्हणाले, "प्रशासनातील यंत्रणांनी एकत्र बैठक घेतली तर एकत्र मार्ग निघू शकतो म्हणून आजची बैठक घेण्यात आली. प्रशासन स्तरावर गणेशोत्सवाच्या काळात दिवस रात्र काम करतात. पोलिस प्रशासन, महापालिका अधिकारी कर्मचारी ४८ तास काम करत असतात. समन्वय जर ठेवला तर आपला त्रास कमी होईल, ज्या सूचना गणेश मंडळानी आम्हाला दिल्या त्या आम्ही अमलात आणू. सगळ्यात मोठा "मान" हा ईश्वराचा आहे. तुम्ही जर मनावर घेतलं की आपण ईश्वरासाठी सगळं करतोय आणि एकमेकांशी समन्वय साधला तर यंत्रणेवरचा ताण कमी होईल."

\

सह पोलिस आयुक्त, रंजन कुमार शर्मा गणेश मंडळांना सूचना देत म्हणाले, "गणेश मंडळाने स्वयंसेवक ठेवणे गरजेचे आहे. कुठल्या ही गणेश मंडळांनी लेझर लाईट चे बुकिंग करू नये. अनेक ठिकाणांहून वर्गणी वसूल केल्या गेल्याच्या तक्रारी येत आहेत. वर्गणी सक्ती कोणी ही करू नये. पुणे मेट्रो यांच्यासोबत सुद्धा एक बैठक घेण्यात आली आहे."

यावेळी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, "गणेश मंडळांना त्रास होणार नाही अशी ग्वाही मी यावेळी देतो. ज्यांच्या काही उणिवा आहेत त्यावर आम्ही नक्की काम करू. गणेशोत्सवादरम्यान, यंदा ४० टक्के जास्त पोर्टेबल स्वच्छतागृह कार्यान्वित केले जाणार आहेत. पुण्यातील गणेशोत्सवाला भावनिक किनार आहे. सामाजिक बांधिलकी यावर जास्तीत जास्त भर देणे गरजेचे आहे. बंधनं लावली नाहीत तर आमची नोकरी जाईल, आमची भूमिका बदलेल पण आमची भावना हीच आहे की गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करायचा आहे."

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अखेर भाषण करत, विसर्जन मिरवणुकीच्या बाबत अंतिम निर्णय आणि भूमिका २५ तारखेला घेतली जाईल असं म्हणाले. अमितेश कुमार म्हणाले, "सगळे गणेश मंडळं आमच्यासाठी सारखे आहेत. कोणी छोटे नाही कोणी मोठे नाही. विसर्जन मिरनावणुकीचा जो वाद सुरू आहे त्याबाबत सुद्धा आमचे बोलणे सुरू आहे, सर्वांचे हित आणि मानसिकता लक्षात ठेवून २५ तारखेपर्यंत निराकरण केलं जाईल."

शहरातील काही गणेश मंडळांच्या प्रतिनिधी यांनी मांडलेल्या भूमिकेवर पोलिस आयुक्त यांनी नाराजी व्यक्त केली. "काही दिवसांपूर्वी आम्ही गणेश मंडळांची बैठक घेतली. एक आधी घेतली आणि त्याच दिवशी नंतर एक घेतली. त्यावेळी आमच्यावर बेछूट आरोप झाले की आयुक्त यांनी शाळेच्या विद्यार्थ्यासाठी बसवले, आम्हाला बिस्कीट आणि त्यांना बिर्याणी दिली. आता बिर्याणी कुठून आली? कुठल्या कल्पकतेतून आली? बेछूट बोलू नका", असं आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.

मार्ग निघेल, शांततेत निघेल कोणाला त्रास होणार नाही विश्वास ठेवा. २५ तारखेला विसर्जन मिरवणुकीच्या बाबत अंतिम निर्णय होईल असं म्हणत आयुक्त यांनी त्यांचे भाषण संपवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyclone Shakti Alert: शक्ती चक्रीवादळाचा मुंबईला फटका बसणार का? VIDEO

Shreyas Iyer : लेट आला पण थेट उपकर्णधार झाला! भारताचा भावी Captain ठरला? श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी

Shocking: १० महिन्यातच संसाराचा भयंकर शेवट! नवऱ्यावर बायकोने केला लैंगिक शोषणाचे आरोप

Maharashtra Live News Update : भाजप आमदार गोपीचंद पडळकर नरमले; जयंत पाटील यांच्याविषयी बोलण्यास स्पष्ट नकार

Kojagiri Purnima: कोजागिरी पौर्णिमेला काय करावे अन् काय करू नये?

SCROLL FOR NEXT