Maharashtra Ganpati Festival 2024:  Saamtv
मुंबई/पुणे

Pune Ganeshotsav 2024: पुण्यनगरी सजली! ढोल ताशांचा गजर अन् ऐतिहासिक देखावे; ५ मानाच्या गणपतींची वैभवशाली परंपरा, यंदाची तयारी कशी? जाणून घ्या..

Maharashtra Ganpati Festival 2024: दरवर्षीप्रमाणे पुण्यामध्ये गणेश उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत असून मानाचे पाच गणपती आणि इतर प्रमुख गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. यावर्षी देखील या सार्वजनिक मंडळांकडून अनेक वर्षांपासूनची वैभवशाली परंपरा कायम ठेवत आकर्षक देखावे तयार केले आहेत.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे|ता. ६ सप्टेंबर २०२४

Pune Ganpati Festival 2024: गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. उद्या गणेश चतुर्थी निमित्त घरगुती गणपतीसह सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. दरवर्षीप्रमाणे पुण्यामध्ये गणेश उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत असून मानाचे पाच गणपती आणि इतर प्रमुख गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. यावर्षी देखील या सार्वजनिक मंडळांकडून अनेक वर्षांपासूनची वैभवशाली परंपरा कायम ठेवत आकर्षक देखावे तयार केले आहेत. जाणून घ्या पुण्यातील गणपती उत्सवाची तयारी अन् यावर्षी सादर केलेले देखावे आणि वैशिष्ट्ये.

१. मानाचा पहिला गणपती: पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती

देखावा: श्री सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक

प्राणप्रतिष्ठा: ११ वाजून ३७ मिन

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: प्रभात बँड, संघर्ष ढोल पथक, शौर्य ढोल ताशा पथक, श्रीराम पथक

२. मानाचा दुसरा गणपती: तांबडी जोगेश्वरी

देखावा: स्वानंद निवास

प्राणप्रतिष्ठा: दुपारी १२ वाजून ११ मिनिटे

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: न्यू गंधर्व ब्रास बँड, शिवमुद्रा ढोल ताशा पथक, ताल पथक, विष्णूनाद शंख पथक

३. मानाचा तिसरा गणपती: गुरुजी तालीम मंडळ

देखावा: गजमहाल

प्राणप्रतिष्ठा: दुपारी १ वाजून ३१ मिनिटे...

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज ब्रास बँड, गुरुजी प्रतिष्ठान ढोल ताशा पथक, रुद्रांग ढोल ताशा पथक , आवर्तन ढोल ताशा पथक

४. मानाचा चौथा गणपती: तुळशीबाग गणपती उत्सव मंडळ

देखावा: ओडिशा येथील श्री जगन्नाथ मंदिर

प्राणप्रतिष्ठा: दुपारी १२.३० वाजता

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: लोणकर बंधूचा नगारा, शिवगर्जना ढोल पथक आणि विघ्नहर्ता ढोल ताशा पथक

५. मानाचा पाचवा गणपती: केसरीवाडा गणपती

देखावा: ऐतिहासिक केसरीवाड्यात बाप्पा विराजमान होणार

प्राणप्रतिष्ठा: सकाळी ११ वाजता

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: पालखीमधून श्रींची मिरवणूक काढली जाईल. यावेळी श्रीराम ढोल ताशा पथक आणि गंधाक्ष पथक यांचे वादन होईल.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

देखावा: हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिर

प्राणप्रतिष्ठा: ११ वाजून ११ मिन

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: फुलांच्या सिंह रथातून मिरवणुकीला देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधूंची सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड आणि गंधाक्ष ढोल-ताशा

अखिल मंडई मंडळ

देखावा: पुरातन काळातील "शिवालय"

प्राणप्रतिष्ठा: दुपारी १२ वाजता

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: त्रिशूळ रथातून बाप्पाचे स्वागत. मिरवणुकीच्या अग्रभागी न्यू गंधर्व बॅन्ड पथक, स्वराज्य, सामर्थ्य ढोल पथक यांचे वादन

हुतात्मा बाबू गेनु मंडळ

देखावा: मदुराई येथील मीनाक्षी मंदिर

प्राणप्रतिष्ठा: दुपारी १२.३० वाजता

स्वागत मिरवणुकीचे आकर्षण: गजांत लक्ष्मी रथातून बाप्पाच्या स्वागतासाठी रूद्र गर्जना, नु. म. वी, मोरया व शिवप्रताप ढोल पथक सज्ज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

SCROLL FOR NEXT