मुंबई/पुणे

Pune Ganesh Visarjan: ढोल-ताशाच्या गजरात पुणेकर गणरायाला निरोप देणार, मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक कधी निघणार?

Pune Manache Ganpati Visarjan Miravanuk Time: पुण्यातील मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गणेश भक्त मोठी गर्दी करतात. या मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक कधी निघणार वाचा सविस्तर....

Priya More

अक्षय बडवे, पुणे

Manache Ganpati Visarjan Miravanuk Time: पुणे शहरात मंगलमय, चैतन्यदायी वातावरणात सुरू असलेला गणेशोत्सव आता अंतिम टप्प्यात आला आहे. मंगळवारी म्हणजे उद्या अनंत चतुर्दशीला गणरायाचे विसर्जन होणार आहे. गणेश मंडळांनीही विसर्जन मिरवणूक मोठ्या दिमाखात आणि पारंपरिक पद्धतीने काढण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी विविध मंडळांचे खास रथ सजवण्याचे काम सुरू झाले आहे. ढोल-ताशा पथके, शंखनाद पथकेही सज्ज झाले आहे. मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख मंडळांनी विसर्जन मिरवणुकीसाठी खास नियोजन केले आहे. मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा येथून मुख्य विसर्जन मिरवणुकीला मंगळारी सकाळी सुरुवात होईल.

कसबा गणपती -

ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची मंगळवारी सकाळी १०.३० वाजता मंडईतील टिळक पुतळ्यासमोर पूजा झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होईल. गणरायासमोर नगारखाना, रमणबाग पथक, कामयानी संस्थेचे पथक, परशुराम पथक, रूद गर्जना, प्रभात बँड आपली सेवा सादर करतील.

तांबडी जोगेश्वरी -

सकाळी ९ वाजता जोगेश्वरी चौकातील मांडवातून श्रींची मूर्ती पालखीत विराजमान होईल. मिरवणुकीत नगारा वादन, न्यू न्यू गंधर्व ब्रास बँड, समर्थ प्रतिष्ठान, शिवमुद्रा ढोल-ताशा पथक मिरवणुकीत वादन करतील.

गुरुजी तालीम -

विसर्जन मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारावादन यासह गर्जना ढोल ताशा पथक, नादब्रह्म ढोल पथक वादन करतील. फुलांच्या आकर्षक सूर्य रथातून श्रींची विसर्जन मिरवणूक सुरु होईल. मिरवणूक सकाळी १०:३० वाजता लोकमान्य टिळक पुतळ्यापासून प्रारंभ होईल.

तुळशीबाग मंडळ -

श्री तुळशीबाग गणरायाची श्री जगन्नाथ स्थातून वैभवशाली विसर्जन मिरवणूक निघणार आहे. मेट्रो पुलामुळे उंचीला मर्यादा असल्याने हायड्रॉलिकचा वापर करण्यात येणार आहे. रथावर श्री जगन्नाथ, बलभद्र, सुभदा या देवता असणार आहेत. पारंपारिक वाद्य यासह शिवमुद्रा ढोल पथक मिरवणुकीत वादन करतील.

केसरीवाडा गणपती -

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती परंपरेप्रमाणे फुलांनी सजविलेल्या पालखीत विराजमान असणार असतील. मिरवणुकीत श्रीराम, शिवमुद्रा, आवर्तन डोल-ताशा पथक असणार आहेत. इतिहासतज्ज्ञ मोहन शेटे हे लोकमान्यांच्या पैशभूषेत मिरवणुकीत सहभागी होतील.

श्रीमंत दगडूशेठ गणपती -

संध्याकाळी चार वाजता श्रींची मिरवणूक श्री उमांग मलज रथातून निघेल. आणि त्यासोबतच मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-ताशा पथक, सनई-चौघडा असा लवाजमा असेल. त्याचसोबत पुरुषांसह महिला गणेशभक्त मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT