अक्षय बडवे , साम प्रतिनिधी
गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे लावणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. डीजेवर प्रेशर मिडचा वापर केल्यास गु्न्हा दाखल केला जाणार आहे. मिरवणुकीत अनेक मंडळ डीजे लावत असतात. डीजेमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असते. त्यापार्श्वभूमीवर हे निर्बंध लावण्यात आली आहेत. अनेजजण डीजेमध्ये वेगवेगळ्या मोठ्या आवाजासाठी 'प्रेशर मिड' या उपकरणाचा वापर करत असतात. हे उपकरण वापरण्यावर निर्बंध घालण्यात आली आहेत.
राज्यात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मंगळवारी गणेश विसर्जन होणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसंदर्भात नवीन नियम तयार करण्यात आली आहेत. डीजेच्या वापरावर काही निर्बंध घालून देण्यात आलेत. गणेश विसर्जनच्या मिरवणुकीत अनेक मंडळ डीजे लावत असतात. या डिजेचा आवाज अधिक यावा, यासाठी अनेकजण यात प्रेशर मिडचा वापर करतात.
या प्रणालीचा वापर केल्याने डिजेचा आवाज अधिक येत असतो. पंरतु यामुळे ध्वनी प्रदूषणात वाढ होत असते. डीजेमध्ये वेगवेगळ्या मोठ्या आवाजासाठी प्रेशर मिड या उपकरणाचा वापर केला जातो. या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते तसेच मानवी शरीरावर घातक परिणाम होतात. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी असे प्रेशर मिड वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय. विसर्जन मिरवणुकी दरम्यान ड्रोनचा वापरण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असणार आहे.
नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील डीजे आणि लेझर लाइटमुळे पुण्यात एका २३ वर्षीय तरुणाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली होती. अनिकेत शिगवण नावाच्या २३ वर्षाचा मुलगा डिजेच्या गाण्यावर नाचत होता. त्यावेळी त्याच्या डोळ्यावर काही सेकंदांसाठी लेझरचा झोत पडला. त्यानंतर त्याला एका डोळ्याने दिसेनासे झालं. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याची दृष्टी पूर्वीसारखी होणं शक्य नसल्याचं म्हटलंय.
दरम्यान आज रविवार असल्याने पुण्यातील गणेशोत्सव अनुभवण्यासाठी आज हजारोंच्या संख्येने भाविक दगडूशेठ हलवाई गणेश मंडळात आलेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिर परिसरात आज पहाटे पासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दगडूशेठ, मंडई यासह पुण्यातील अनेक मंडळांचे देखावे आणि बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी पाहायला मिळाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.