ED raids in Pune  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Fraud: पुण्यात १०० कोटींचा 'घपला', ED ची मोठी कारवाई; गुंतवणुकीच्या जाळ्यात कसे गुंतवायचे?

Pune News: या प्रकरणात ईडीकडून (ED) पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी

Pune Fraud News:

ऑनलाईन व्यवहार वाढल्याने ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हेही वाढले आहेत. पुणे शहरात ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. नुकताच पुण्यातील फेक ऑनलाईन कंपनीचा अजब प्रताप समोर आला असून गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल १०० कोटींची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खोटी कंपनी स्थापन करुन त्यामध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याच्या आमिषाने तब्बल १०० कोटींची फसवणूक केल्याचे प्रकरण पुण्यात उघडकीस आले. या प्रकरणात ईडीकडून (ED) पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2020 मध्ये पुण्यातील आंबेगाव परिसरात फ्रॉड ऑनलाईन कंपनी सुरू करत ही गुंतवणूक करण्यात आली होती. या फसवणूक प्रकरणात एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे वेगवेगळ्या बँक अकाउंटमध्ये पैसे घेत हवालामार्फत ही सगळी रक्कम परदेशात ट्रान्सफर केले असल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.

या प्रकरणाने शहरात एकच खळबळ उडाली असून मुख्य आरोपी आणि कंपनीचा मालक दुबईला पळून गेला असल्याचेही सांगण्यात येत आहे. आरोपींच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT