Pune Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Fire News : खेडमध्ये सिलेंडरच्या स्फोटात घर जळाले; पुणे शहरात भीषण अग्नितांडव, एकाच दिवशी तीन आगीच्या घटना

Pune Fire News: पुणे शहरात काल तीन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. उंड्री, बी. टी. कवडे रस्ता आणि मुंढवा या तीन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत.

Rohini Gudaghe

Fire Incidents At Kawade Road Mundhwa And Undri

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. शॉर्ट सर्किट व सिलेंडरच्या स्फोटामुळे घराला भयंकर आग लागली. (Fire Incidents) होती. खेडमधील बहिरवेली नं.१ येथे घराला रात्री दिडच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली होती. घराला लागलेल्या भीषण आगीत सर्व जळून खाक झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Latest Marathi News)

पुणे (Pune) शहरात काल (२८ मार्च) भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं. शहरामध्ये एकाच दिवशी तीन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. उंड्री, बी. टी. कवडे रस्ता आणि मुंढवा या तीन ठिकाणी आगीच्या घटना (Pune Fire News) घडल्या आहेत. आपण या घटनांविषयी सविस्तर पाहू या. आग लागल्याची पहिली घटना उंड्रीमध्ये घडली तर दुसरी घटना बी. टी. कवडे रस्त्यावर घडल्याचं समोर आलं आहे. आगीची तिसरी घटना मुंढवा भागात घडली. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु तिन्ही घटनांमध्ये आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळतेय.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंढवा येथील बंगल्यातील किचनला आग ((Pune Fire) लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये आई आणि मुलगा जखमी झाला आहे. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. या आगीत अंजली ईश्वर सकत (वय-५८), (Pune News) जतिन ईश्वर सकत (वय-३२) असे जखमी झालेल्या आई आणि मुलाचे नाव आहे.

शहरात पहिली घटना उंड्री येथे घडली होती. होले वस्ती येथील पञ्याच्या शेडमध्ये एक 'एम के स्क्रॅप सेंटर' आहे. तेथील येथील भंगार मालाच्या साठ्याला आग लागली (Fire News) होती. या घटनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

आग लागल्याची दुसरी घटना बी. टी. कवडे रस्त्यावरील सोलेश पार्क सोसायटी येथील आवारात घडली होती. या आवारातील महावितरणच्या २०० के व्ही पॅनल बोर्ड व शेजारीच असणाऱ्या दोन डीपीने पेट घेतला (Mundhwa And Undri) होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याच्या मारा करत आगीवर नियंत्रण मिळवत धोका दुर केला.

तिनही घटनास्थळी अग्निशमन दल तात्काळ पोहोचले होते. त्यांनी बचावकार्य करून आग आटोक्यात (Fire Incidents At Kawade Road) आणली. त्यामुळे जीवितहानी टळली आहे. पुणे शहरात २८ मार्च रोजी तीन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT