Washim Fire News : आसोला, नेतंसामध्ये आगीच्या घटना, संसारपयोगी वस्तूंसह शेतीचे साहित्य जळून खाक

एकंदरीत रिसोड तालुक्यातील दोन्ही गावामधे लागलेल्या आगीमध्ये लाखोंच साहित्य जळून खाक झाले आहे. दरम्यान या घटनेत नुकसान झालेल्या कुटुंबांना शासकीय आर्थिक मदत मिळावी अशी मागणी हाेऊ लागली आहे.
fire breaks out in risod and netansa near washim
fire breaks out in risod and netansa near washimsaam tv
Published On

- मनोज जयस्वाल

Washim :

वाशिम जिल्ह्यातील रिसोड (risod) तालुक्यातील आसोला (aasola) आणि नेतन्सा (netansa) या ठिकाणी आग लागल्याचा घटना समोर आल्या आहेत. या आगीमध्ये घरातील साहित्यासह शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आसोलां येथील संदीप पाचरणे यांच्या शेतातील गोठ्याला आगीत बियाण्यांसाठी ठेवलेली पंधरा पोते सोयाबीन,तसेच तुर 6 पोते, टिव्ही ,विहिरीतील मोटर पंप, इंजन, टिन पत्रे,रिकामे पोते, पलंग, विद्युत केबल, डीएपी खताची पोते हे जळून खाक झाले आहे.

fire breaks out in risod and netansa near washim
Risod Krushi Utpanna Bazar Samiti : 'चिल्लर' कारणामुळं वाशिमपाठोपाठ रिसोडचीही बाजार समिती ३१ मार्चपर्यंत राहणार बंद

नेतंसा येथे रात्री 3 वाजे दरम्यान शेख सय्यद महेबुब सय्यद यांच्या जनावरांच्या गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून गोठ्यातील दोन बैल भाजली असून अनेक शेतोपयोगी साहित्य, गोठ्यावरील टिन पत्रे, जनावरांचा कडबा, कुटार देखील जळून खाक झाले.

त्या गोठ्याला लागूनच घराला देखील आग लागली. घरातील सर्वच साखर झोपेत असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. या घटनेत घरातील धान्य तसेच इतर दैनंदिन गरजेच्या वस्तू जळून भस्म झाल्या यांचे देखील जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.

एकंदरीत रिसोड तालुक्यातील दोन्ही गावामधे लागलेल्या आगीमध्ये लाखोंच साहित्य जळून खाक झाले आहे. दरम्यान या घटनेत नुकसान झालेल्या कुटुंबांना शासकीय आर्थिक मदत मिळावी अशी मागणी हाेऊ लागली आहे.

Edited By : Siddharth Latkar

fire breaks out in risod and netansa near washim
Paduka Darshan Utsav: आजच्या घडीला माणसाला संत शिकवणीची गरज, मनोज जोशींनी सांगितलं संत परंपरेचं महत्व

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com