Pune fake Currency Racket संग्रहित छायाचित्र
मुंबई/पुणे

Pune : पुणेकरांनो नोटा बघून वापरा! बनावट नोटांच्या रॅकेटचा भंडाफोड, २८ लाखांच्या डुप्लिकेट नोटा जप्त

duplicate notes seizure Pune : पुणेकरांनो सावधान! पोलिसांनी २८ लाखांच्या बनावट नोटा जप्त करून ५ जणांना अटक केली. नोटा वापरण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासा.

Namdeo Kumbhar

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

Pune fake Currency Racket : पुणेकरांनो नोटा बघून वापरा! कारण, पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा भंडाफोड केलाय. पोलिसांनी २८ लाख रूपये किंमतीच्या डुप्लिकेट नोटा जप्त केल्या आहेत. त्याशिवाय बनावट नोटांचं मशीन ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी ५ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. बनावट नोटा सापड्यामुळे पुण्यात नेमकं काय सुरू आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पुण्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २८ लाख ६६ हजार १०० रुपये किंमतीच्या बनावट नोटा पकडल्या आहेत. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये दोन महिलांचाही सहभाग आहे. पोलिसांनी आरोपींकडून एक प्रिंटर मशीन तसेच ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांचे प्रिंटेड गठ्ठे हस्तगत करण्यात आले आहेत. ही कारवाई शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाने केली आहे. मनीषा ठाणेकर, भारतीय गवंड, सचिन यमगर,नरेश शेट्टी, प्रभू गुगलचड्डी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.

बँकेत बनावट नोटा जमा केल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आला. पोलिसांनी २८ लाख ६६ हजार १०० रुपयांच्या प्रिंट केलेल्या बनावट नोटा आणि २ लाख ४ हजार रुपयांच्या खऱ्या नोटा जप्त केल्या आहेत. पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बनावट नोटा तयार करणांऱ्यामध्ये आणखी कुणाचा हात आहे का? याचा तपास करण्या येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

SCROLL FOR NEXT