Siddhi Hande
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून १० रुपयांत चहा अन् २० रुपयांत कॉफी मिळत आहे.
हवाई प्रवास करताना योग्य दरात चांगले अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उडान कॅफे नावाने उपाहरगृह सुरु करण्यात आले आहे.
या कॅफेमधून विमान प्रवाशांना एअरपोर्टवर स्वस्तात चांगले अन्नपदार्थ मिळणार आहे.
या कॅफेमधून तुम्हाला २० रुपयांत वडापावदेखील मिळणार आहे.
१० रुपयांत पाणी, २० रुपयांत समोसा अन् मिठाई मिळणार आहे.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज या कॅफेमधून वडापाव विकत घेऊन त्याचा स्वाद घेतला आहे.
एअरपोर्टवर अन्नपदार्थ खूप महाग विकले जातात. त्यामुळे पुणे एअरपोर्टवर हे उपहारगृह सुरु करण्यात आले आहे. येथे तुम्हाला कमीत कमी किंमतीत चांगले अन्नपदार्थ मिळतात.