Pune : मित्रांसोबत फिरायला गेला अन् माघारी परतलाच नाही, मुळशी धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Mulshi Dam, Pune Latest News : पुण्यातील मुळशी धरणात २४ वर्षीय कृष्णा सोळंके पोहताना बुडाले. एनडीआरएफच्या प्रयत्नांनंतरही वाचवता आले नाही. पौड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
drowns
drownsSaam Tv News
Published On

Pune Latest News Update : पुण्यातील मुळशी धरणात बुडून एका तरूणाचा मृत्यू झालाय. मित्रांसोबत तो पोहण्यासाठी गेला होता, त्यावेळी तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कृष्णा संतोष सोळंके, वय २४ वर्षे ,रा.पिंपळे सौदागर असे मुळशी धरणाच्‍या पाण्‍यात बुडून मयत झालेल्‍या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुमित सुनिल लांडे (वय २४, रा. केशव नगर, मुंडवा, पुणे) यांनी पौड पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा, सुमित आणि त्यांचे काही मित्र रविवारी सकाळी फिरण्यासाठी मुळशी धरण परिसरात गेले होते. त्यावेळी पळसे येथील जलाशयात पोहण्यासाठी मित्र उतरले. पोहताना कृष्णाला पाण्याचा अंदाज आला नाही अन् तो बुडाला.

drowns
Jalgaon Bus Accident: ट्रकने कट मारला अन् ५० प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस खड्ड्यात, जळगावात अपघात

घटनास्थळाजवळच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची (एनडीआरएफ) टीम सराव करत होती. एनडीआरएफच्या जवानांनी तातडीने शोधमोहीम राबवून कृष्णाला पाण्याबाहेर काढले आणि त्याला सीपीआर दिला. मात्र, त्याची कोणतीही हालचाल होत नव्हती. त्याला तातडीने पौड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

drowns
भारताचा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राइक, शोएब अख्तरसह १६ YouTube चॅनेल्सवर बंदी

मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीनेही बचावकार्यात सहभाग घेतला, परंतु कृष्णाला वाचवता आले नाही. पौड पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धरण परिसरात पोहण्यासाठी जाणाऱ्या तरुणांनी सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com