संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी
Jalgaon bus accident, ST bus falls into pit : जळगावमध्ये अंगावर शहारा आणणारी घटना घडली. एसटी बसमधील प्रवाशाचं नशीब बलवत्तर होतं म्हणून सुदैवाने मोठा अनर्थ टळला. ट्रकने कट मारल्याने प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी बस खड्ड्यात गेली. जळगावमधील आहुजा नगर ते द्वारका नगर या थांब्यादरम्यान हा अपघात झाला. एसटी बसला अपघात झाला त्यावेळी साधारण ४० ते ५० प्रवाशी होते. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. बस झाडाझुडपांमध्ये अडकल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे प्रवाशांनी सांगितले. या अपघातानंतर ट्रक चालकावे घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली असून शोध घेतला जातोय.
निंभोरेहून जळगावला येणारी एसटी बस आहुजा नगर स्टॉपजवळ आली होती. त्याचवेळ ट्रकने कट मारला. ट्रकने कट मारल्यामुळे एसटी चालकाचा संयम सुटला. एसटी बस समांतर रस्त्याच्या खड्ड्यात उतरली. सुदैवाने बस झाडाझुडपांमध्ये अडकली आणि मोठा अनर्थ टळला. कारण, बस ज्या खड्यावर अडकली तो खड्डा मोठा होता. प्रवाशांचे दैव बलवत्तर होतं म्हणून दुर्घटना टळली.
बस पलटी होऊन खड्ड्यात पडली असती तर मात्र मोठी दुर्घटना झाली असती. बसमध्ये ४० ते ५० प्रवासी होते, मात्र कुणालाही दुखापत झाली नाही. ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. अपघातामुळे प्रवासी व चालक-वाहक घाबरले होते. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. चालक रमेश चौधरी आणि वाहक गोपाल सूर्यवंशी यांनी बसमधील प्रवाशांना धीर दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.