Pune Fake Call Center Saam TV News
मुंबई/पुणे

Pune : पुण्यातील बनावट कॉल सेंटरमध्ये चहा , नाष्टासुद्धा बाहेरून येत नव्हता

Pune Fake Call Center : पुण्यातील बनावट कॉल सेंटर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, अमेरिकन नागरिकांकडून दररोज लाखो रुपयांची फसवणूक. पाच आरोपी अटकेत, तीन फरार.

Namdeo Kumbhar

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

Pune Fake Call Center Case : पुण्यातील बनावट कॉल सेंटर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॉल सेंटरमध्ये काय चालले आहे, याची माहिती बाहेरील व्यक्तीला मिळू नये म्हणून गुप्तता पाळली जात होती. चहा, नाष्टा सुद्धा बाहेरून येत नव्हता. कॉल सेंटर मधील कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारीच कंपनीमध्ये चहा आणि नाष्टा बनवत होता.

कॉल सेंटर मध्ये १०० ते १२५ कर्मचारी काम होते, त्यांच्यापैकी एकजणाकडे चहा आणि नाष्टा बनवायची जबाबदारी होती. खराडी भागातील बनावट कॉल सेंटर वर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी छापेमारी केली होती. त्यामध्ये आता धक्कादायक माहिती समोर येत आहे.

अमेरिकन नागरिकांना भीती दाखवून लाखो रुपये या पुण्यातील कॉल सेंटरमधून उकळले जायचे. याप्रकरणी आत्तापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित तीन आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. गुन्हे शाखेच्या पथकांकडून त्यातील एक पथक नवी मुंबई व दुसरे पथक अहमदाबाद येथे पाठवण्यात आले आहे. यातील अटक केलेल्या आरोपींच्या घराची झडती घेण्यात आली असून पोलिसांना लॅपटॉप, पेन ड्राईव्ह मिळाले आहेत.

पुण्यातील बनावट कॉल सेंटर प्रकरण

कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्यांना दररोज एक लाख अमेरिकन नागरिकांचा डेटा देण्यात येत होता. पुण्यात बसून शेकडो अमेरिकन नागरिकांची ३० ते ४० हजार डॉलर्स ची फसवणूक करण्यात आली. ‘तुमच्या खात्यातून अमली पदार्थांचे व्यवहार झाले आहेत. या व्यवहारांमुळे तुम्हाला पोलिसांकडून अटक केली जाऊ शकते,’ अशी भीती दाखवत रोज तब्बल ३० ते ४० हजार डॉलर्स (सुमारे ३२ ते ३३ लाख रुपये) अमेरिकन नागरिकांकडून उकळले जात होते. हा पैसा हवालाच्या माध्यमातून भारतात येत होता.

क्रिप्टो करन्सी किंवा अमेझॉन गिफ्ट व्हाउचर्सच्या स्वरूपातही नागरिकांकडून पैसे उकळले जात होते. आरोपी या कॉलसेंटरमधून मागील सहा महिन्यात किती अमेरिकन नागरिकांना कॉल करण्यात आले, हे सद्या पोलिस पडताळून पाहत आहेत. माहिती गोळा करून एनसीआरबीकडे (नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो) पाठवून देण्यात येणार आहे. या गुन्ह्यात आत्तापर्यंत पाच जणांना अटक केली असून, मुख्य सूत्रधारासह ३ जण फरार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HPCL Recruitment: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी, पगार २.८ लाख रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Thackeray: काही तासांत ठाकरेंची तोफ धडाडणार; युतीची घोषणा होणार? आधी अन् शेवटी कोण भाषण करणार? A टू Z माहिती..

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT