Pune Crime : पुण्यात खळबळ! ज्वेलर्सकडून दागिने घेऊन फसवणूक, पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई

Pune Cop Suspended : औंध येथील सराफाला माजी अधिकाऱ्याचे नाव सांगून ८.२२ लाखांचे दागिने घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील पोलिस हवालदार गणेश जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Pune cop fraud, police jewellery scam,
Pune cop fraud, police jewellery scam,
Published On

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune cop fraud, police jewellery scam, : पुणे पोलिसांची मान शरमेने खाली जाणारी घटना समोर आली आहे. एका पोलिसाने ज्वेलर्सकडून सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिसानेच फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली. पुण्यातील औंधमध्ये ही घटना घडली.

औंधमधील एका ज्वेलर्सकडून दागिने घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. संबंधित कर्मचाऱ्याने एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव पुढे करून सुमारे साडे आठ लाखांचे दागिने घेतले होते.

Pune cop fraud, police jewellery scam,
Cyclone News : महाराष्ट्राला चक्रीवादळ धडकणार? पुढील ३६ तास महत्त्वाचे, अतिमुसळधार पावसाची शक्यता

ज्वेलर्सने याबाबत पोलिस विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीनंतर विभागाने त्या कर्मचाऱ्याला पैसे किंवा दागिने परत करण्याचे आदेश दिले. पण त्याने आदेशाचे पालन केले नाही ,शेवटी पोलीस विभागाने कारवाई करत त्याला निलंबित केले आहे

Pune cop fraud, police jewellery scam,
Mumbai : टेलिग्रामवर ओळख, गे ग्रुपमधील ४ जणांनी तरुणावर अत्याचार केले, व्हिडिओ व्हायरल करून ब्लॅकमेल

गणेश अशोक जगताप,असे निलंबनाची कारवाई झालेल्या विशेष शाखेच्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. पोलिस हवालदार जगताप यांनी औंध येथील एका ज्वेलर्सच्या दुकानातून शहर पोलिस दलातील एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव सांगून ८ लाख २२ हजार २२० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेतले होते.

Pune cop fraud, police jewellery scam,
Satara - Konkan : आता महाबळेश्वरहून थेट कोकणात जा, सातारा-रत्नागिरीला केबल ब्रिज जोडणार

सराफ व्यावसायिकाने जगताप यांच्याकडे दागिन्याच्या पैशाची मागणी केल्यानंतर सुरुवातीला टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी देऊन पैसे न देता त्यांची फसवणूक केली. हा सगळा प्रकार लक्षात आल्या नंतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून जगताप यांना संबंधित सराफ व्यावसायिकास दागिने किंवा पैसे देण्याचे आदेश दिले होते. मात्र, जगताप यांनी या आदेशाचे पालन केले नाही आणि आता याचमुळे त्या पोलिसावर कारवाई करणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com