Mumbai : टेलिग्रामवर ओळख, गे ग्रुपमधील ४ जणांनी तरुणावर अत्याचार केले, व्हिडिओ व्हायरल करून ब्लॅकमेल

Mumbai crime news : मुंबईच्या जोगेश्वरीत २६ वर्षीय तरुणावर टेलिग्रामवरून ओळख झालेल्या चौघांनी अत्याचार केला. व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत बँक खात्यातून ४१ हजार रुपये उकळले. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
Mumbai Youth Assaulted and Blackmailed by Telegram Group 4 Arrested in Jogeshwari Case
Mumbai Youth Assaulted and Blackmailed by Telegram Group 4 Arrested in Jogeshwari Case
Published On

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai Youth Assaulted and Blackmailed by Telegram Group: मुंबईच्या जोगेश्वरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल माध्यम टेलिग्रामवर मैत्री करणे 26 वर्षीय तरुणाला चांगलेच महागात पडले. चार जणांनी 26 वर्ष तरुणांशी मैत्री करून त्याच्यासोबत शरीर संबंध बनवून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करत वायरल करण्याची धमकी देत तरुणाला मारहाण केली. जबरदस्तीने त्याच्याकडील दोन बँकांचे एटीएम कार्ड आणि त्याचे पासवर्ड घेऊन खात्यातील 41 हजार रुपये काढून घेतले. ही गोष्ट कुणाला सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित तरुणाने मेघवाडी पोलीस ठाण्यात चार आरोपीं विरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी कलम 309(6), 127(2), 115, 351(3), 352, 3(5) बी एन एस सह आय टी ऍक्ट 66(E) गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पूर्वेकडील शंकरवाडी परिसरात राहणाऱ्या 26 वर्षे तरुणाची टेलिग्राम या सोशल माध्यमातून चार तरुणांची ओळख झाली. टेलिग्राम वरील गे मैत्री ग्रुपच्या माध्यमातून ते नेहमी एकमेकांशी चॅटिंग करत असे. या चारही तरुणांनी पीडित तरुणाला जोगेश्वरी शंकरवाडी परिसरातील पहिल्या मजल्यावर एका घरी बोलावून घेतले. यावेळी चारही तरुणांनी त्याच्यासोबत शरीर संबंध बनवले त्यावेळी त्याचे व्हिडिओ चित्रीकरण देखील केले. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत या चौघांनी त्याच्याकडून दोन बँकांचे एटीएम कार्ड आणि त्याचा पासवर्ड जबरदस्तीने घेऊन बँकांच्या खात्यातील 41 हजार रुपये काढून घेतले. तरुणाला मारहाण देखील केली. म्हणून तरुणाने या चारही आरोपींविरोधात मेघवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Mumbai Youth Assaulted and Blackmailed by Telegram Group 4 Arrested in Jogeshwari Case
Cyclone News : महाराष्ट्राला चक्रीवादळ धडकणार? पुढील ३६ तास महत्त्वाचे, अतिमुसळधार पावसाची शक्यता

पीडिताच्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, मेघवाडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संपत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली संभाजी जाधव वपोनि मेघवाडी, पो नि पवरे यांनी गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने योग्य त्या सूचना देऊन गुन्हा उघड करण्याचे आदेश दिले. तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या दोन टीम बनवून तपास चालू केला. यातील आरोपी यांनी फिर्यादी यांना घेऊन आले त्या दिशेचे व ज्या दिशेने गेले त्या दिशेचे 30 ते 40 खाजगी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. आरोपीने ज्या एटीएम मधून पैसे काढले त्या एटीएम चे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. CCTV फुटेज गुप्त माहिती दारांना पाठवले असता आरोपी हे मेघवाडी आमीना नगर व बांद्रा प्लॉट येथे राहत असल्याचे गुप्त माहिती दाराकडून माहिती प्राप्त झाली.

Mumbai Youth Assaulted and Blackmailed by Telegram Group 4 Arrested in Jogeshwari Case
Mumbai Rain : छत्री घेऊनच बाहेर पडा! संध्याकाळानंतर मुंबईत अति मुसळधार पावसाचा इशारा

आरोपी राहत असलेल्या परिसरात जाऊन सापळा रचून याहीया तज्जामुल हुसैन शेख (19 वर्षे) शाहीद वाजिद सय्यद (19 वर्षे ), रियाज मुनाफ शहा (20 वर्षे) आणि मुस्तफा अबार खान (19 वर्षे) अशी चौघांना अटक केली. या सर्व आरोपींकडून लुटलेले मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे या सर्व आरोपींना अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. मेघवाडी पोलीस सध्या या आरोपींचा कसून तपास करत असून यांनी यापूर्वी असे गुन्हे किंवा इतर प्रकारचे कोणते गुन्हे कृत्य केले आहे का या संदर्भात शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com