Hinjewadi Accident News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Dumper Accident: भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटलं; डंपरखाली येत दोन तरुणींचा मृत्यू

Hinjewadi Accident News : भरधाव वेगानं निघालेला रेडिमिक्स डंपर पलटी होऊन हा अपघात झाला. यामध्ये डंपरखाली येऊन दोन तरुणींचा मृत्यू झालाय.

Bharat Jadhav

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

पुण्यातील हिंजवडीत मोठा अपघाताची घटना घडलीय. भरधाव वेगानं निघालेला रेडिमिक्स डंपर पलटी होऊन हा अपघात झाला. या अपघातात दोन तरुणींचा जागीच मृत्यू झालाय. यामध्ये डंपरखाली दुचाकीवर असलेल्या दोन महिलांचा दबून मृत्यू झालाय. वाहन वळवत असताना डंपरवरील चालकाचा सुटल्यानं हा अपघात झाला.

डंपरखाली दुचाकी दबल्यानं जागीच दुचाकीवरील दोन तरुणींचा मृत्यू झाला आहे. क्रेनच्या साह्यानं रेडिमिक्स डंपर हटवण्यात आला. चालकाला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मृत महिलांची ओळख पटवण्यात येत आहेत. पोलिसांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार या तरुणींचं वय २० ते २५ वर्षे असून त्या नोकरी करत होत्या.

असा घडला अपघात

माण रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नर येथे रेडिमिक्स डंपर पलटी होऊन दोन तरुणी जागीच ठार झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार रेडिमिक्सने भरलेला डंपर (एमएच 12/एक्सएल 5744) हिंजवडीकडून महाळुंगेच्या दिशेला चालला होता. वडजाईनगर कॉर्नर येथे वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटला आणि तो पलटी झाला. त्याचवेळी स्कुटरवरून चाललेल्या दोन तरुणी डंपर खाली आल्या. त्यात त्यांचा चिरडून जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, घटनास्थळी हिंजवडी पोलीस पोहचत क्रेनच्या सहाय्याने रेडिमिक्स डंपर उचलून दोघींना बाहेर काढण्यात आले. दोन्ही तरुणींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दोन्ही तरुणी आयटी अभियंता असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या दुचाकीवरून दोघी चालल्या होत्या. दरम्यान याप्रकरणी हिंजवडी पोलीस अपघाताचा तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT