Pune: मुंबई-बंगळूर महामार्गावर 3 कोटींचे अंमली पदार्थ जप्त सागर आव्हाड
मुंबई/पुणे

Pune: मुंबई-बंगळूर महामार्गावर 3 कोटींचे अंमली पदार्थ जप्त

राजगड पोलिसांची मोठी कारवाई

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

सागर आव्हाड

राजगड: मुंबईहून गोव्याला Mumbai-Goa निघालेल्या लक्झरी बसमधून राजगड पोलिसांनी Rajgad Police पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर शुक्रवारी पहाटे सुमारे बत्तीस लाख रुपये किमतीचा सहा किलो चरस कारवाई 6Kg Drugs Seized करत जप्त केला आहे. याप्रकरणी एका आरोपीस ताब्यात घेतले असून राजगड पोलिसांची याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.

हे देखील पहा-

या कारवाईबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ते गोवा या मार्गावर धावणाऱ्या डॉल्फिन ट्रॅव्हल्स मधून एक व्यक्ती चरस घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हा व्यक्ती पुण्याहून गोव्याला जात होता. त्यानुसार राजगड पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास खेड-शिवापूर टोल नाक्यावर ट्रॅव्हल्स अडवून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 6 किलो अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती भोर उपविभागाचे एसडीपीओ धनंजय पाटील यांनी दिली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधींची किंमत;

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या चरसची कोट्यवधी रुपये किंमत असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी अधिक माहिती देत सांगितले की, जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमीतकमी 3 कोटी रुपये आहे आणि भारतीय बाजारपेठेत त्याची किंमत 33 लाख रुपये असणे अपेक्षित आहे. पुणे ग्रामीण मध्ये येणाऱ्या राजगड पोलिस ठाण्याच्या पथकाने खेड शिवापूर टोल Khed Shivapur Toll नाक्याजवळ गोव्याला जाणाऱ्या बसमधून हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.

अटक केलेल्या व्यक्तीचे नाव मोस्ताकिन धुनिया आहे.आरोपीवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : दुपारी उन्हाचा चटका, पहाटे गारठा, वाचा राज्यातील हवामानाचा अंदाज

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT