Weather: महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये धुव्वाधार पावसाची शक्यता; IMD चा इशारा

देशात अनेक भागातून मान्सून आता परतीच्या मार्गावर आहे. काही राज्यांमध्ये पावसाचा परतीचा दौरा अद्याप शिल्लक आहे.
Weather: महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये धुव्वाधार पावसाची शक्यता; IMD चा इशारा
Weather: महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये धुव्वाधार पावसाची शक्यता; IMD चा इशाराSaam Tv
Published On

नवी दिल्ली: देशात अनेक भागातून मान्सून Monsoon आता परतीच्या मार्गावर आहे. काही राज्यांमध्ये पावसाचा परतीचा दौरा अद्याप पूर्ण शिल्लक आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील चार दिवसात महाराष्ट्र Maharashtra तसेच गोवा राज्यासह Goa 6 राज्यांच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस Heavy Rains होण्याची शक्यता आहे.

हे देखील पहा-

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शुक्रवारी अंदमान आणि निकोबारमध्ये Andaman Nicobar मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर कोकण तसेच गोवा मध्ये, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग, कर्नाटकातील किनारपट्टीतील काही भाग, केरळ आणि पुद्दुचेरी येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व भागात याद्या म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस पडू शकतो. या भागाव्यतिरिक्त, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकलमध्ये 10 ऑक्टोबर रोजी मुसळधार पशु पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या क्षेत्रात 11 ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस पडू शकतो.

IMD चे नॅशनल वेदर फोरकास्टिंग सेंटरचे National Weather Forecasting Center वरिष्ठ पूर्वानुमानकार आर के जेनामणि यांनी माहिती दिली की, 1960 नंतर ही दुसरी वेळ आहे, जेव्हा मान्सून इतक्या उशिरा परतत आहे. तब्बल 20 दिवसांनी मान्सून विलंबित आहे.

एकूणच, देशात जूनमध्ये 110 टक्के पाऊस झालं आहे, तर जुलैमध्ये 93 टक्के पाऊस झाला आणि ऑगस्ट महिन्यामध्ये 76 टक्के एवढा पाऊस झाला आहे. पावसाळ्यात या महिन्यांमध्ये सर्वाधिक पाऊस पडत असतो. या वर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये कमी पाऊस झाला आहे. तरी सप्टेंबरमध्ये त्याची उणीव भरुन निघाली आहे. कारण मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये 135 टक्के रेकॉर्ड ब्रेक पाऊस Record Break Rain झाला.

Weather: महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये धुव्वाधार पावसाची शक्यता; IMD चा इशारा
Delhi: गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी दाखल

महाराष्ट्रात असा असेल पाऊस;

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. पुण्यासह ठाणे आणि घाट परिसरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस पडला आहे. शिवाय मराठवाड्यात सुद्धा ढगफुटी सारख्या पावसाने झोपडळपून काढलं आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. परंतु येत्या पाच दिवसामध्ये राज्यात विदर्भातील Vidarbha काही जिल्हे वगळले तर राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आकाशात विजांचा कडकडाट होऊ शकतो त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

गुलाब चक्रीवादळामुळे Gulab Cyclone महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. यानंतर आता बंगालच्या उपसागरात Bay Of Bengal पुढील तीन दिवसांत पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. ओडिशा Odisha आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीकडे पुढील चार ते पाच दिवसांत हे हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सरकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com