Pune Drink And Drive Accident: पुण्यात दारू पिऊन गाडी चालवण्याची आणखी एक घटना घडली आहे. दारूच्या नशेत एका चालकाने नाकाबंदी करणाऱ्या महिला पोलिसाला उडवल्याचा प्रकार घडलाय. पुण्यातील मिल्स परिसरात रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. पोलिसांकडून याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला कॉन्स्टेबला नाकेबंदी करताना गाडीने उडवलं. पुण्यातील मिल्स परिसरातील पबमधून बाहेर पडलेल्या एका भरधाव वाहनाने महिला पोलिसाला चिरडल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. नायडू लेन (RTO ऑफिस जवळ) रुबी हॉस्पिटल कडून आरटीओच्या दिशेने जाताना हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दीपमाला राजू नायर असे जखमी महिला पोलिसाचे नाव आहे.
बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. रविवारी मध्यरात्री दीड वाजता भरधाव वेगात आलेल्या कारचालकाने नाकाबंदी दरम्यान रस्त्यावर उभे असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला चिरडले. गंभीर जखमी झालेल्या या महिला कर्मचाऱ्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुण्यात काल रात्री महिला कॉन्स्टेबलला नाकीबंदी दरम्यान उडवलं..भरदाव वेगाने आलेल्या चार चाकी कारने नाकाबंदी साठी तैनात असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला धडक दिली आहे.पुणे स्टेशन परिसरातील काल रात्री घटना घडलीय.अपघातात रात्री गस्तीसाठी तैनात असणाऱ्या महिला पोलिस जखमी झाली आहे.दीपमाला नायर असं जखमी महिला पोलीस कर्मचाऱ्याच नाव आहे.पोलिस सीसीटिव्ही माध्यमातून आरोपीचा तपास आहेत.याप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पोलिस वाहन चालकाचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.