पुण्यात ३० वर्षांनी डबल-डेकर बस धावणार आहे.
१९९५ मध्ये डबल-डेकर बस बंद झाल्या होत्या.
यासंबंधित चाचण्या पीएमपीएमएलद्वारे सुरु आहेत.
PMPML द्वारे आयोजित केलेल्या ट्रायल रन यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आता पुण्यात लवकरच डबल-डेकर बस धावताना दिसणार आहेत. १९९५ मध्ये पुण्यात डबल डेकर बस बंद झाल्या होत्या. आता तब्बल ३० वर्षांनंतर डबल डेकर बसेस पुनरागमनासाठी सज्ज झाल्या आहेत. चाचण्या पूर्ण झाल्या असून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या बसेस पुण्यात दिसतील अशी माहिती समोर आली आहे.
'स्विच मोबिलिटीने बनवण्यात आलेल्या इलेक्ट्रिक, वातानुकूलित बसेसनी चाचण्यांदरम्यान चांगली कामगिरी केली आहे. ऑपरेशन सुरु झाल्यानंतर तिकीटदर १०० रुपयांनी कमी केले जातील. सध्या ट्रायल यशस्वी झाला आहे. आमचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे हे वरच्या डेकवर अडथळा आणणाऱ्या झाडांच्या फांद्या यांसारख्या लहान समस्यांबाबत पुणे महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला पत्र पाठवणार आहेत. त्यानुसार बैठकीत निर्णय घेतले जातील', असे पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी म्हटले.
प्रत्येक डबल-डेकर बसमध्ये ६५ प्रवाशांची बसण्याची क्षमता आणि २० प्रवाशांसाठी उभे राहण्याची जागा आहे. मगरपट्टा ते कल्याणीनगर, रामवाडी मेट्रो स्टेशन ते इंटरनॅशनल टेक पार्क (खराडी), पुणे स्टेशन ते पुणे विमानतळ, देहू ते आळंदी, चिंचवड ते हिंजवडी अशा वर्तुळाकार मार्गावर डबल डेकर बसची सेवा उपलब्ध असेल.
हिंजवडी आणि मगरपट्टा यांसारख्या प्रमुख आयटी हबमध्ये काम करणाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या मार्गावर गर्दी असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. डबल-डेकर बसमध्ये नियमित बसपेक्षा जवळपास दुप्पट प्रवासी प्रवास करु शकतात. याशिवाय इलेक्ट्रिक बसमुळे प्रदूषणही कमी प्रमाणात होईल. दैनंदिन प्रवासासाठी हा उत्तम पर्याय असल्याचे पुणेकरांनी म्हटले आहे. ही डबल-डेकर बस येत्या काही दिवसात पुण्यात दिसेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.