Pune Spa Center Prostitution Saam TV News
मुंबई/पुणे

Pune News : 'स्पा सेंटरमध्ये फक्त स्पा चालू ठेवा, अन्यथा...' पुणे पोलिसांचा मालकांना सज्जड दम

Pune Crime News : पुणे पोलिसांनी काल बुधवारी शहरातील १३ स्पा सेंटरवर छापेमारी करत स्पा मालक आणि चालक यांना सज्जड दम भरला आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय किंवा इतर गोष्टी केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी या स्पा सेंटर चालकांना दिला आहे.

Akshay Badve

पुणे : पुणे पोलिसांनी काल बुधवारी शहरातील १३ स्पा सेंटरवर छापेमारी करत स्पा मालक आणि चालक यांना सज्जड दम भरला आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय किंवा इतर गोष्टी केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी या स्पा सेंटर चालकांना दिला आहे. काल मंगळवारी रात्री पुण्यातील विमानतळ आणि बाणेर भागातील दोन स्पा सेंटरवर कारवाई करत पोलिसांनी १८ मुलींची सुटका केली होती. या कारवाईत १० पेक्षा अधिक मुली या परदेशी नागरिक आहेत. या छापेमारीमध्ये स्पा सेंटरचे मालक, मॅनेजर तसेच मूळ जागा मालक यांच्यावर गुन्हे दाखल करत पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसायाच्या विरोधातील कारवाईचा पुढचा टप्पा म्हणून आज बुधवारी देखील परिमंडळ ४ अंतर्गत येणाऱ्या विविध भागात पोलिसांनी छापेमारी केली. परिमंडळ ४ अंतर्गत विमाननगर, कल्याणी नगर, बाणेर, बालेवाडी, विश्रांतवाडी, खराडी असे उच्चभ्रू भाग आहेत. आज परिमंडळ ४ अंतर्गत येणाऱ्या बाणेर पोलिस ठाणे, चंदन नगर पोलिस ठाणे, येरवडा पोलिस ठाणे, विमानतळ पोलिस ठाणे यांनी त्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या स्पा सेंटर वर छापेमारी केली. आज पोलिसांनी १३ स्पा सेंटर वर छापेमारी केली असता तेथे वेश्याव्यवसाय किंवा त्या संदर्भातील गोष्टी आढळून आल्या नसल्या तरी सुद्धा कारवाई दरम्यान पोलिसांनी स्पा सेंटर चालकांना आणि मॅनेजर यांना सज्जड दम भरला. 'स्पा सेंटरमध्ये फक्त स्पा चालू ठेवा, इतर काही गोष्टी सुरू असल्याचं निदर्शनास आलं तर कठोर कारवाई केली जाईल', असा इशारा पोलिसांनी या स्पा चालकांना दिला.

पोलिस उपायुक्त सोमय मुंडे म्हणाले, 'परिमंडळ ४ अंतर्गत येणाऱ्या विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत आमची कारवाई सुरू आहे. ज्या स्पा सेंटरमध्ये स्पाच्या नावाखाली देहव्यापार किंवा इतर अश्लील गोष्टी सुरू असतील तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल. या कारवाईचा भाग म्हणून १३ स्पा सेंटरवर छापेमारी करत आम्ही त्या ठिकाणच्या स्पा चालकांना आणि मॅनेजर यांना सक्त ताकीद दिली आहे'.

शहरातील अनेक भागात स्पा सेंटर सुरू आहेत, यातील काही ठिकाणी स्पाच्या नावाखाली देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी अशा अनधिकृत स्पा सेंटरवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Winners List : बिग बॉस सीझन 1 ते 19; कोण कोण ठरलं BB ट्रॉफीचे मानकरी? पाहा विजेत्यांची यादी

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna : पहिल्या नजरेत प्रेम! ९ वर्षांचा संसार; फिल्मी स्टाइल प्रपोज, वाचा गौरव खन्नाची प्यारवाली लव्हस्टोरी

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्नाने उचलली 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी; फरहाना भट्टला दिली मात

Bigg Boss 19 - Pranit More : 'बिग बॉस १९' चे घर गाजवणाऱ्या महाराष्ट्रीयन भाऊची संपत्ती किती?

Pranit More Struggle Journey : दादरची चाळ ते बिग बॉसचे घर कसा होता प्रणित मोरेचा संघर्षमय प्रवास? वाचा महाराष्ट्रीयन भाऊची कहाणी

SCROLL FOR NEXT