Pune crime  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : नवऱ्याकडून ५ कोटी पोटगी मिळाली, दुसरं लग्न करायला निघाली; पण साडेतीन कोटी गमावले, नेमकं काय घडलं?

pune Crime news : पुण्यातील महिलेला ऑस्ट्रेलितील नागरिकाने साडेतीन कोटीचा गंडा घातला आहे. या आरोपीला पोलिसांनी मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतलं आहे.

Vishal Gangurde

सचिन जाधव, साम टीव्ही

महिलेला नवऱ्याकडून ५ कोटी पोटगी मिळाली. त्यानंतर नवऱ्यापासून वेगळी झालेल्या महिलेने दुसरं लग्नासाठी शोधाशोध सुरु केली. दिल्लीतून पुण्यातील खराडी भागात वास्तव्याला असताना महिलेने लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर शोधाशोध सुरु केली. तिथे एका भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन नागरिकाशी ओळख झाली. दोघांमध्ये मैत्री वाढली. मैत्रीनंतर विश्वास संपादन केल्यानंतर या नागरिकाने महिलेला साडेतीन कोटींचा गंडा घातल्याची घटना घडली. या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ठगास अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील महिला पुण्यातील खराडी भागात राहत असताना लग्न करण्यासाठी लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर प्रोफाईल तयार केली होती. तिला भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन नागरिकाने २०२३ साली मेसेज केला. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. या नागरिकाने महिलेला लग्नाचं आश्वासन देऊन विश्वास संपादित केला. डॉ. रोहित ओबेरॉय असे ऑस्ट्रेलियन नागरिकाचे नाव आहे. डॉ. रोहितने आणि महिला पुणे आणि भारतातील इतर ठिकाणी एकत्र राहिले. या महिलेकडे मोठी रक्कम असल्याचे रोहितला कळालं.

महिलेला घटस्फोटानंतर पतीकडून ५ कोटी रुपये मिळाले होते. ही बाब रोहितला कळताच त्याने संधीचा फायदा घ्यायचं ठरवलं. रोहितने महिलेला व्यवसायासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून फंड मिळवू देतो असं सांगत वेळोवेळी साडेतीन कोटी रुपये उकळले. कालांतराने रोहित ऑस्ट्रेलियाला गेला. त्यानंतर पीडित महिलेशी बोलण्यास टाळाटाळ करून तोंडाचा कॅन्सर झाल्याचे सांगितले. त्यानंतर कायमचा संपर्क बंद केला. पुढे सप्टेंबर २०२४ रोजी त्याच्या साथीदाराने रोहित मरण पावल्याचे सांगितले. महिलेने याची पडताळणी केली. मात्र, तो जिवंत असल्याचे समजले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे महिलेला समजले.

दरम्यान, पोलिसांच्या तपासात रोहितचे खरे नाव अभिषेक शुक्ला असल्याचे समजले. मूळचा लखनौचा असलेला अभिषेक ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये राहतो. या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने लुक ऑउट सर्क्युलर जारी केलं. अभिषेक सिंगापूरवरून मुंबईला आल्याचं कळताच त्याला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलं. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. या आरोपीने आणखी किती महिलांना लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक गंडा घातला आहे का, याची माहिती घेण्याचे कामकाज सायबर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल,आशिया कप स्पर्धेत कोण बाजी मारणार?

Kendra Trikona Rajyog: 30 वर्षांनंतर शनीने बनवला पॉवरफुल योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

SCROLL FOR NEXT