Pune Cyber Crime
Pune Cyber Crime Saam TV
मुंबई/पुणे

Pune Cyber Crime: सावधान! २ महिन्यांत ५ वेळा जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेक अकाउंट, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Ruchika Jadhav

Pune Crime News: बनावट फेसबुक अकाउंट तयार करुन नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या नावे फेसबुक किंवा अन्य सोशल मीडिया अकाउंटवर अधिकाऱ्यांच्या नावे फेक अकाउंट उघडले जात आहे. यातून सामान्या नागरिकांना मॅसेज करत त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जातेय. तसेच नागरिकांच्या बँक खात्यावर डल्ला मारला जात आहे. (Fake Facebook Account)

पुणेकर सावधान!

पुण्यात (Pune) काही नागरिकांसोबत अशी फसवणूक होण्याची शक्यता आहे. कारण पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आणखी एक बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यात आले आहे. सायबर चोरट्यांच्या रडारवर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख आहेत. त्यांच्या नावाने फेक अकाउंट तयार करत नागरिकांची फसवणूक करण्याचा सायबर सोरट्यांचा डाव आहे.

कसं आहे बनावट फेसबुक अकाउंट

राजेश देशमुख यांचे फोटो वापरत तसेच आयएएस असे लिहीत बनावट फेसबुक (Facebook) अकाउंट तयार करण्यात आले आहे. या आधी देखील राजेश देशमुख यांच्या नावे फेक अकाउंट बनवल्याचे समोर आले होते. पोलिसात तक्रार करून सुद्धा जिल्हाधिकारी देशमुख यांचे खोटे अकाउंट बनवले जात आहे.

दोन महिन्यांत ५ वेळा फेक अकाउंट

पोलिसांत तक्रार दाखल करुन देखील फेक अकाउंट (Fake Account) बनवण्याच्या घटना कमी झालेल्या नाहीत. अद्यापही फेक अकाउंट तयार करण्याचे सत्र सुरुच आहे. गेल्या दोन महिन्यात ५ ते ६ वेळा देशमुख यांच्या नावाने बनावट अकाउंट तयार करून सायबर चोरटे नागरिकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठत आहेत. त्यामुळे कुठल्याही बनावट अकाउंटला बळी पडू नका असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: नदीवर फूले टाकण्यासाठी गेली अन् पडली; पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे वृद्ध महिलेला मिळालं जीवनदान

Marathi Live News Updates : मुंबई गोवा महामार्गावर सहा फुटांपर्यंत पाणी, अनेक वाहने पडली अडकून

Manoj Jarange Video : चंद्रकांत पाटलांनी सरकारची सुपारी घेऊ नये, ओबीसीतून आरक्षण घेणारच; परभणीत मनोज जरांगे कडाडले

IND vs ZIM 2nd T20 : भारताने काढला पराभवाचा वचपा; झिम्बॉब्वेच्या गोलंदाजांची तुफान धुलाई, २३४ धावा चोपल्या

Amruta Khanvilkar : पिवळ्या रंगात न्हाऊन निघाली चंद्रा...

SCROLL FOR NEXT