Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

Pune Police: पुण्यामध्ये टोळक्यांनी भरचौकात राडा केला. लोखंडी रॉड, दगड आणि लाकडी दांडक्याने दोघांना मारहाण करण्यात आली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

Summary -

  • नारायण पेठेत टोळक्यांनी दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला केला.

  • लोखंडी रॉड आणि दगडांनी मारहाण करत दहशत पसरवली.

  • सीसीटीव्ही फुटेजमध्ये फिर्यादीवर देखील गुन्हा दाखल झाल्याचे समोर आले.

  • पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातील नारायण पेठमध्ये दहशत पसरवण्यासाठी टोळक्यांनी दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला केला होता. लोखंडी रॉड आणि दगडाच्या सहाय्याने त्यांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा दुसरा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. फिर्याद देणाऱ्यानेच आधी मारहाणीला सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी फिर्यादीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण पेठेत दहशत माजवण्यासाठी हा सर्व प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नारायण पेठ परिसरात बाहेरचे गुंड आणून दहशत पसरवण्याच प्रयत्न करण्यात आला. स्वप्नील मोरेने मुरलीधर हॉटेलच्या मारुती मंदीरास लोखंडी फलक लावण्याचा घाट घातला होता. मात्र तेथील दुकानदार, गोपाळ तिवारी, कामासाठी आलेल्या हर्ष शिर्के यांनी नागरीक आणि ग्राहकांना हा फलक अडचणीचा आणि धोकादायक ठरणार असल्याने सांगून लाऊ दिला नाही. या दरम्यान हर्ष शिर्के, स्वप्नील मोरे आणि त्यांचा ३ ते ४ सहकारी यांच्यात झटापट ही झाली होती.

बोर्ड काढल्यानंतर गोपाळ तिवारी यांनी हा विषय सोडून दिला होता.मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजता हर्षचा भाऊ मुकुंद शिर्के आणि निखील जगताप दोघे मोपेडवरुन जात असताना स्वप्नील मोरे आणि त्याच्या १० ते १५ जणांनी त्यांची गाडी अडवली. 'काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का?', असे म्हणून ते दोघांच्या अंगावर आले. स्वप्नीलने लोखंडी रोडने मुकुंद शिर्के याच्या पाठीवर मारले. त्याच्या साथीदाराने निखील जगतापला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांना दगडे फेकून मारले.

यावेळी आरोपींनी त्यांच्या मोटारसायकलवर दगडाने आणि लाकडी बांबुने तोडफोड करुन नुकसान केले. पोलिसांनी दोन्ही गटाविरोधात गुन्हे दाखल केले असून पोलिस निरीक्षक अरुण घोडके तपास करीत आहेत. याबाबत फिर्याद देणारा स्वप्नील मोरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकमेकांविरुद्ध या प्रकरणात गुन्हे दाखल झाले असून या प्रकरणाचे सीसीटीव्ही आता समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Scheme: २५ लाखांपर्यंत कॅशलेस उपचार अन् मोफत औषधे; सरकारची खास योजना

Bigg Boss Marathi 6 : प्राजक्ता शुक्रेने बिग बॉसला ठोकला रामराम, 'त्या' एका चुकीने थेट घराबाहेर जावे लागले

India Tourism : तीन टेकड्यांवर उभा असलेला अभेद्य भव्य किल्ला, 'येथे' घ्या रोमांचक ट्रेकिंगचा अनुभव

Korean Skin Care Tips: सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी फॉलो करा 'कोरियन स्किनकेअर रूटीन', या 5 घरगुती टिप्स

Mumbai : 'बुलाती है मगर जाने का नहीं' पुरुषांना जाळ्यात ओढायच्या, कॅफेत नेऊन भलतंच करायच्या, मुंबईतील धक्कादायक प्रकार समोर

SCROLL FOR NEXT