PUNE WOMAN POLICE CONSTABLE HARASSMENT CASE HUSBAND AND IN-LAWS BOOKED Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात चाललंय काय? महिला पोलीस अधिकाऱ्याचा सासरच्या मंडळीकडून छळ अन् मारहाण, ६ जणांविरुद्ध गुन्हा

Pune Crime News : पुण्यात महिला पोलीस अंमलदाराला सासरच्या छळाला सामोरे जावे लागल्याची धक्कादायक घटना. पतीसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

Alisha Khedekar

  • महिला पोलीस अंमलदारावर सासरचा छळ

  • पतीसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  • मानसिक व शारीरिक अत्याचाराचे आरोप

  • उरुळी कांचन पोलिसांकडून पुढील तपास सुरू

सागर आव्हाड, पुणे

पुणे जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला पोलीस अंमलदारालाच सासरच्या छळाला सामोरे जावे लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या प्रियंका शिवकुमार खबाले (वय २५) यांनी आपल्या पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध छळ आणि मारहाणीची तक्रार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका यांचा विवाह डिसेंबर २०२१ मध्ये धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे झाला होता. लग्नावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणात सोन्या-नाण्यांसह रोख रक्कम आणि घरगुती साहित्य दिले होते. सुरुवातीचे काही महिने व्यवस्थित गेल्यानंतर सासरच्या मंडळींचा त्रास सुरू झाला. आजारी पडल्यावर त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले नाहीत, उलट “तुझ्या माहेरी जाऊन उपचार करून घे” असे सांगत त्यांना माहेरी पाठवण्यात आले.

यानंतर प्रियंका यांनी पुढील शिक्षणासाठी संगणक क्लास सुरू केला असता, सासरच्या लोकांनी त्याला विरोध केला. त्यांना घरातच थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि जास्तीची घरकामे देऊन त्रास दिला जात होता. तरीही त्यांनी हार न मानता पोलीस भरतीची तयारी केली. मात्र, त्यांच्या पतीने दारूच्या नशेत येऊन “भरती झालीस तर तुला नांदवणार नाही” अशी धमकी दिली होती.

अडचणींवर मात करत प्रियंका २९ मे २०२३ रोजी पोलीस दलात दाखल झाल्या. प्रशिक्षण पूर्ण करून नोकरीला रुजू झाल्यानंतरही सासरचा छळ थांबला नाही. त्यांच्या पगारावरून घर खर्च चालत असतानाही पती व इतरांनी त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण केली. डिसेंबर २०२५ मध्ये त्यांना घराबाहेर काढण्यात आले.

सध्या त्या शिंदवणे येथे भाड्याच्या घरात एकट्या राहत असून, तिथेही पतीने येऊन मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. अखेर सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गौरी क्षीरसागर करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: सून- सासऱ्याच्या अफेअरने संपूर्ण कुटुंबाचा शेवट, नवऱ्याने स्वत: विष पित बायकोला दिलं; नंतर वडील अन् भावाचा मृतदेह आढळला

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र बंदला मनमाड मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद, सकाळ पासून शहरात कडकडीत बंद

NEET Paper Leak : पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, पीएम मोदींची घोषणा

Maharashtra Bandh: आज 'महाराष्ट्र बंद'; काय सुरू अन् काय बंद? जाणून घ्या सविस्तर

पावसाळ्यात प्या हेल्दी आणि टेस्टी 4 घरगुती सूप, झटक्यात वजन होईल कमी

SCROLL FOR NEXT