Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

संतापजनक! धावत्या बसमध्ये महिलेसोबत धक्कादायक कृत्य, नराधम 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात; त्या २४ तासांत नेमकं काय घडलं?

Pune Crime News : हैदराबादहून पुण्याकडे येणाऱ्या धावत्या स्लीपर बसमध्ये महिलेचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना. पीडितेने मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण करून पुरावा दिल्यानंतर हडपसर पोलिसांनी आरोपीला काही तासांत अटक केली.

Alisha Khedekar

  • हैदराबाद–पुणे स्लीपर बसमध्ये महिलेचा विनयभंग

  • पीडितेने प्रसंगावधान राखून व्हिडिओ काढला

  • हडपसर पोलिसांची कारवाई

  • आरोपी अटकेत

मुंबईच्या धावत्या खोपोली लोकलमध्ये एका तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना ताजी असतानाच हैदराबादहून पुण्याला येणाऱ्या धावत्या स्लीपर बसमध्ये महिलेचा विनयभंग झाला असल्याची संतापजनक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, महिला आपल्या पतीसोबत प्रवास करत असतानाच हा प्रकार घडला. मात्र, हडपसर पोलिसांनी तत्परता दाखवत काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ९ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता हैदराबाद येथून एका खासगी बसने पुण्यातील हडपसरच्या दिशेने येत होती. महिला आणि तिचा नवरा स्लीपर सीटवर झोपलेले होते. पहाटेच्या सुमारास बसमध्ये उपस्थित असलेल्या निशीत कुमार यशवंत सिंग याने पीडितेसोबत अश्लील कृत्य केले.

आरोपीच्या या घाणेरड्या कृत्यामुळे महिला दचकून जागी झाली आणि तिने प्रसंगावधान राखून गपचूप या घटनेचे आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले. बस पुण्यात आल्यानंतर पीडित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पीडितेने दिलेला व्हिडिओ पुरावा म्हणून ग्राह्य धरत पोलिसांनी आरोपी निशीत कुमारला अटक केली. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी २४ तासांच्या आत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. पोलिसांच्या तत्परतेचं कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Death: बॉलिवूडवर शोककळा! देव आनंद यांचे सुपुत्र अभिनेते सुनील आनंद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ITR Filing : शेवटचे 2 दिवस उरले! फॉर्म 16 मिळाला नाही? तरीही ITR भरता येतो का? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Swine Flu : तुम्हाला स्वाईन फ्लू झालाय? 'ही' ६ लक्षणे वेळीच ओळखा नाहीतर...

Shocking: नामांकित शाळेसमोर सुरू होता वेश्या व्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली; ५ तरुणी अन् २ पुरूषांना नको त्या अवस्थेत पकडलं

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका सुरूच; मुंबईत प्रसिद्ध क्रिकेट क्लबवर FDA ची कारवाई, किचनमध्ये झुरळं आढळल्याचे उघड

SCROLL FOR NEXT