Vanraj Andekar Killed Case Update Saam Tv
मुंबई/पुणे

Vanraj Andhare Case: वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट, घटनेपूर्वी आरोपींनी केला होता गोळीबाराचा सराव

Vanraj Andekar Killed Case Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. वनराज यांची हत्या करण्यापूर्वी आरोपींनी गोळीबाराचा सराव केला होता.

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणात (Vanraj Andekar Case) मोठी अपडेट समोर आली आहे. वनराज आंदेकर यांची हत्या करण्यापूर्वी आरोपींनी पूर्वतयारी म्हणून गोळीबाराचा सराव केला होता. आंदेकरांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी आंदेकर यांच्या हत्येसाठी मध्य प्रदेशातून पिस्तुल पुरवण्यात आल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी आणखी एकाला अटक केली होती. आतापर्यंत या हत्या प्रकरणात २१ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये वनराज आंदेकर यांच्या दोन बहिणी आणि मेहुण्यांचा देखील समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा खून करण्यापूर्वी आरोपींनी पूर्वतयारी म्हणून पिस्तुलातून गोळीबाराचा सराव केला होता. त्या ठिकाणाचा पोलिस शोध घेत असून या गुन्ह्यात आणखी आरोपींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे अशी माहिती पोलिसांनी कोर्टामध्ये दिली. या गुन्ह्यातील आरोपी असलेले सागर राजेंद्र पवार (३२ वर्षे), साहिल ऊर्फ टक्या नीलेश दळवी (१९ वर्षे) आणि प्रसाद पांडुरंग बेल्हेकर ३३ वर्षे) यांच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्यामुळे त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते.

तिन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीत ५ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर अन्य १२ आरोपींची रवानगी कोर्टाने न्यायालयीन कोठडीत केली आहे. या गुन्ह्याचा रचलेला कट, त्याची पूर्वतयारी आणि अंमलबजावणी या अनुषंगाने पोलिस कोठडीत असलेले गणेश लक्ष्मण कोमकर आणि टोळीप्रमुख सोमनाथ सयाजी गायकवाड यांच्या समवेत या तीन आरोपींकडे तपास करायचा आहे. आरोपींकडून १० कोयते जप्त करण्यात आले असून आणखीन तीन कोयते जप्त करायचे बाकी आहेत. आरोपींना पिस्तूल खरेदीसाठी कोणी आर्थिक मदत केली होती?, त्यांनी गोळीबाराचा सराव कुठे केला? याबाबत सर्व आरोपींची समोरासमोर चौकशी करणे बाकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

SCROLL FOR NEXT