Pune Airport: पुणेकरांचा विमान प्रवास महागला, तिकीट दरात 20 ते 30 टक्क्यांनी वाढ; वाचा नवे दर

Pune Air Ticket Expensive: पुणेकरांना विमान प्रवासासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहे. ऐन सणासुधीच्या दिवसात तिकीट दरामध्ये वाढ झाल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
Pune Airport: पुणेकरांचा विमान प्रवास महागला, तिकीट दरात 20 ते 30 टक्क्यांनी वाढ; वाचा नवे दर
Pune Air Ticket Expensive Saam Tv
Published On

सचिन जाधव, पुणे

पुणेकरांसाठी मोठी बातमी आहे. पुणेकरांचा विमान प्रवास महागला आहे. तिकीटाच्या दरामध्ये मोठ्याप्रमाणात वाढ करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत दसरा, दिवाळी सण असल्यामुळे विमानातून प्रवास करण्याची संख्या वाढली आहे. त्यामुळे विमान तिकिटाच्या दरात मोठी वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पुण्यावरून इतर शहरामध्ये प्रवास करणाऱ्यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.

पुण्यातून दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई या शहरादरम्यान नियमित तिकिटादराच्या तुलनेत 20 ते 30 टक्के वाढ झाली आहे. दिवाळीच्या काळात आणखी तिकीट दर दरात वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यातून देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या जास्त आहे. पुण्यातून दिवसाला साधारण 180 ते 190 विमाने उड्डाण घेतात. त्यातून रोज 30 ते 31 हजार प्रवासी प्रवास करतात. दिल्ली, बंगळुरू या शहरासाठी सर्वाधिक विमाने पुण्यातून सुटतात.

Pune Airport: पुणेकरांचा विमान प्रवास महागला, तिकीट दरात 20 ते 30 टक्क्यांनी वाढ; वाचा नवे दर
Pune Crime : पुण्यासह देशभरात CBIची धडक कारवाई; ₹ ५८००००० रोकड जप्त, नेमकं कारण काय?

दिल्ली, हैदराबाद, कोलकता, चेन्नई शहरादरम्यान दैनंदिन उड्डाण करणारे विमानाची संख्या जास्त आहे. एकीकडे विमान प्रवाशांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे प्रवाशांना पुरेश्या विमान कंपन्या नाहीत. त्यामुळे वाढती प्रवासी संख्या आणि विमानांची सख्या कमी यामुळे मात्र सणासुदीच्या दिवसात प्रवाशांना जास्तीचे तिकीट दर मोजावे लागत आहेत. तिकीट दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पुणेकरांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

विमान प्रवासाचे तिकीट किती?

पुणे -दिल्ली - आधीचे तिकीट - 8,350 आताचे तिकीट - 11,035

पुणे- बेंगळूरू - आधीचे तिकीट - 3,700 आताचे तिकीट - 5,100

पुणे -हैदराबाद - आधीचे तिकीट - 5,500 आताचे तिकीट - 8,100

पुणे - चेन्नई - आधीचे तिकीट - 4,800 आताचे तिकीट - 7,900

Pune Airport: पुणेकरांचा विमान प्रवास महागला, तिकीट दरात 20 ते 30 टक्क्यांनी वाढ; वाचा नवे दर
Pune Politics News : ऐन निवडणुकीत पुण्यात भाजपला सर्वात मोठा धक्का! बड्या नेत्याने शरद पवार गटात केला प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com