Pune Crime : पुण्यासह देशभरात CBIची धडक कारवाई; ₹ ५८००००० रोकड जप्त, नेमकं कारण काय?

pune crime news : सीबीआयने पुण्यासह देशभरात धडक कारवाई केली. सीबीआयने कारवाई करत ५८००००० रोकड जप्त केले आहेत.
पुण्यासह देशभरात CBIची धडक कारवाई; ₹ ५८००००० रोकड जप्त, नेमकं कारण काय?
Pune Crime Saam tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : सीबीआयने पुण्यासह देशभरातील अनेक शहरात छापेमारी केली. पुण्यात केलेल्या कारवाईत सीबीआयने १० जणांना अटक केली आहे. सीबीआयने विविध देशातील नागरिकांना जाळ्यात अडकवून फसवणूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळ्या आहेत. सीबीआयने थेट सायबर गुन्हेगारीचं नेटवर्क उद्धवस्त केलं.

सीबीआयने पुण्यासह देशभर धडक कारवाई केली. सीबीआयने पुण्यातील रिजेंट प्लाझा या ठिकाणी सुरु असलेल्या कॉल सेंटरवर छापेमारी केली. या गुन्ह्यात सायबर नेटवर्कच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात होती. याच सायबर चोरट्यांवर सीबीआयने मोठी कारवाई केली आहे.

पुण्यासह देशभरात CBIची धडक कारवाई; ₹ ५८००००० रोकड जप्त, नेमकं कारण काय?
Wardha Crime: हिंगणघाटात पोषण आहाराच्या काळाबाजार; १ लाख १ हजार ६१५ रुपयांचा धान्यसाठा जप्त

सीबीआयने पुण्यासह हैदराबाद, अहमदाबाद, विशाखापट्टनम या शहरांमधून एकूण २६ जणांना अटक केली आहे. सीबीआयने यासोबत मोबाईल, फोन, लॅपटॉप, इतर इलेक्ट्रॉनिक सामग्री सुद्धा सीबीआयने जप्त केली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत ५८ लाख रुपये रोकडसह ३ मालगाड्या जप्त केल्या आहेत.

सीबीआय अधिकाऱ्यांनी अनेक वस्तू केल्या जप्त

सीबीआयने सायबर गुन्हेगाही प्रकरणात १० जण पुणे, ५ जण हैदराबाद, ११ विशाखापट्टनम या शहरातून अटक केली आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी एकूण ९५१ वस्तू जप्त केल्या आहेत. इलेक्टॉनिक वस्तू, मोबाईल फोन, लॅपटॉप, आर्थिक माहिती अशा विविध वस्तू जप्त केल्या आहेत.

पुण्यासह देशभरात CBIची धडक कारवाई; ₹ ५८००००० रोकड जप्त, नेमकं कारण काय?
Pune Crime: CBI मधून बोलतोय..., पुण्यातील इंजिनिअर तरुणीला घातला ३.५० कोटींचा गंडा

सायबर चोरट्यांकडून आधुनिक यंत्रणाचा वापर

सायबर चोरट्यांनी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी कॉल सेंटर सुरु केलं होतं. आधुनिक यंत्रणांचा वापर करून सायबर चोरट्यांनी नागरिकांची फसवणूक सुरु केली होती. या प्रकरणात एकूण १०० हून अधिक जण सामील असल्याची माहिती मिळत आहे. सायबर चोरटे नागरिकांची फसवणूक करून त्यांची रक्कम इतर खात्यात वळवत होते. या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सीबीआयने शहरातील विविध ठिकाणी पथक पाठवलं. त्यानंतर सीबीआयच्या या पथकांनी अनेकांना ताब्यात घेतलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com